शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कविसंमेलनातून मतदान जनजागृती

By admin | Updated: February 17, 2017 04:45 IST

साहित्य संवर्धन समिती आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स यांच्या वतीने मतदान जनजागृती कविसंमेलन घेण्यात आले. कवी, कथाकार

पिंपरी : साहित्य संवर्धन समिती आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स यांच्या वतीने मतदान जनजागृती कविसंमेलन घेण्यात आले. कवी, कथाकार व गझलकार राज अहेरराव यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या वेळी कवी अनिल दीक्षित, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, सहायक आयुक्त अण्णा बोदाडे, रमेश भोसले, हास्यकवी नंदकुमार कांबळे, सुभाष चव्हाण व उमेश सणस आदी उपस्थित होते. मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या दीपक विश्वकर्मा व उत्कर्षा यादव या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कवयित्री माधुरी विधाटे यांनी भारत माझा देश आहे. लोकशाही या देशाचा आत्मा आहे. लोकशाहीसाठी मतदान आवश्यक आहे. मतदान हा भारतीय संविधानातील आपला मूलभूत हक्क आहे. हा हक्क विचारपूर्वक बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजावण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. तसेच, सर्वांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करण्याचा माझा निर्धार आहे. ही मतदान प्रतिज्ञा सर्वांसाठी सामूहिकपणे म्हणून घेतली. सहायक आयुक्त बोदाडे यांनी मतदान कसे करावे यासाठी मार्गदर्शन केले. अनिल दीक्षित, सुरेश कंक, शोभा जोशी, सविता इंगळे व वर्षा बालगोपाल आदी कवींनी प्रबोधनात्मक मतदान जनजागृतीपर कविता सादर केल्या. समितीचे सचिव सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयश्री मुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. रूपा शहा यांनी आभार मानले. या वेळी लोकशाही पद्धतीचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)