शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी शिवसेनेला मत द्या

By admin | Updated: February 15, 2017 02:07 IST

थेरगाव परिसराचा विकास कोणी केला हे सर्वांना माहिती आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन

पिंपरी : थेरगाव परिसराचा विकास कोणी केला हे सर्वांना माहिती आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी केले. थेरगाव प्रभाग क्रमांक २४ चे शिवसेनेचे उमेदवार शालिनी कांतीलाल गुजर, नीलेश बारणे, सचिन भोसले, दीपाली गुजर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी खासदार बारणे सहभागी झाले होते. ‘खिच के तान धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या फेरीत मोठ्या प्रमाणावर तरुण महिला सहभागी झाल्या होत्या.खासदार बारणे म्हणाले, ‘‘शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाहीत, तर ती आश्वासने पाळतो. अनधिकृत बांधकामे असो किंवा शास्तीकर असो, जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आग्रही राहिलेली आहे. आंदोलने केली आहेत. प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे विकासासाठी शिवसेनेला साथ द्या.’’प्रेरणा बँकेचे संस्थापक तुकारामभाऊ गुजर म्हणाले, ‘‘खासदार अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव परिसराचा विकास झाला आहे. मी शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. आमच्या कुटुंबाचे योगदान सर्वजण जाणताच आहात. सूनबाई शालिनी गुजर निवडणूक रिंगणात आहेत. आम्हाला काम करण्याची संधी जनतेने द्यावी. तसेच शहराच्या राजकारणात अग्रभागी असणाऱ्या कुटुंबातील नीलेश बारणे आहेत. सचिन भोसले हे वकील, तर दीपाली गुजर यांचे कुटुंब समाजकारणात अग्रणी असते. चारही उमेदवार चांगले आहेत. विकासासाठी शिवसेनेला मतदान करायला हवे.’’ (प्रतिनिधी)