शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:49 IST

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : निगडीत बेशिस्त वाहनचालकांमध्ये वाढ

निगडी : बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम कायमच धाब्यावर बसविण्यात येतात. झेब्रा क्रॉसिंगचा नियमच माहिती नसल्यासारखे काही उद्दाम चालक झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करतात. मग रस्ता ओलांडायचा कसा, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करणारे अनेक बेशिस्त वाहनचालक दररोज दिसतात. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया निगडीत असे बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. निगडीतील टिळक चौक, भक्ती शक्ती चौक या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या चौकातून भोसरी, तळवडे एमआयडीसी, तसेच चाकणकडे जाणाºया कामगारवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी रोज या चौकातून मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. परंतु बहुतांश वाहनचालक झेब्रा कॉसिंगवर अथवा त्याहीपुढे आपले वाहन थांबवितात. त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहतूककोंडीतही वाढ झाली आहे. मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढºया रेषेवर चालकांनी थांबणे बंधनकारक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविणे आवश्यक आहे. यात सामाजिक आणि विविध संस्था, तसेच संघटनांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे.ज्येष्ठांना त्रास : पादचाºयांची सुरक्षा धोक्यातझेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणे हा पादचाºयांचा हक्क आहे. अनेक वेळा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगजवळ थांबत नसल्याने पादचाºयांची त्रेधा उडते. त्यांना रस्ता ओलांडताना त्रास होत असतो. ज्येष्ठांसाठी तर ते दिव्य होऊन बसते. एक प्रकारे पादचाºयांच्या हक्कावर गदा आणल्यासारखे होते. सर्वच चालकांनी पादचाºयांच्या हक्काचे पालन करावे, तसेच पादचाºयांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.निगडीतील प्रत्येक चौकातील सिग्नलवर अनेकवेळा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगजवळ थांबत नसल्याने पादचाºयांचे हाल होत असतात. त्यांना रस्ता ओलांडताना त्रास होत असतो. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी. - सतीश कदम, निगडी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड