पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सात गावे समाविष्ट करण्याचा ठराव महासभेत संमत झाला आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय आल्यानंतर गावे समाविष्ट करायची की नाही, याबाबत निर्णय होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी दिली. आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ‘‘महापालिका हद्दीत नव्याने गहुंजे, जांभे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडेगाव ही सात गावे समाविष्ट करण्याचा ठराव १० फेब्रुवारी रोजी महापालिका सभेत संमत झाला. हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविल्यावर त्यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे पाठविला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत तातडीने अभिप्राय नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका हद्दवाढीचा कोणताही निर्णय सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सहा महिने घेणे बंधनकारक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गावे समाविष्ट होणार की नाही, याबाबतचा निर्णय होईल.’’ (प्रतिनिधी)
गावांचा दिवाळीनंतर समावेश
By admin | Updated: November 11, 2015 01:24 IST