शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुलभुलैयाला पालक पडतात बळी

By admin | Updated: December 28, 2015 01:24 IST

‘नाव मोठं लक्षण खोटं’ या म्हणीचे यथार्थ दर्शन शहरातील काही ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या माध्यमातून घडत आहे. त्यातून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे

पिंपरी : ‘नाव मोठं लक्षण खोटं’ या म्हणीचे यथार्थ दर्शन शहरातील काही ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या माध्यमातून घडत आहे. त्यातून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. दर्जात्मक शिक्षण तर दूरच, मात्र पायाभूत सुविधांबाबतही या संस्था सक्षम नाहीत. इंटरनॅशनलच्या ‘भुलभुलैया’ला पालक बळी पडत आहेत. याकडे शिक्षण खात्याचे लक्ष नाही. याबाबत दाद मागायची कोणाकडे, हा प्रश्न आहे. नॅशनल, इंटरनॅशनल असा शब्द इंग्रजी शाळांच्या नावापुढे लावला की, शाळा जागतिक दर्जाच्या झाल्या, असे फॅड शाळांमध्ये दिसून येत आहे. अशा शाळांच्या ‘इंटरनॅशनल’ या शब्दाचा अर्थच उमगला नाही. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये इंग्रजी माध्यमांच्या १४४ शाळा आहेत. त्यापैकी तळवडे, निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, एमआयडीसी, सांगवी, रहाटणी, नेवाळेवस्ती, मोरवाडी, खराळवाडी, काळभोरनगर, वल्लभनगर या भागातील १३ शाळांनी आपल्या नावाभोवती इंटरनॅशनल स्कूल असे बिरूद लावले आहे. इंटरनॅशनल शाळा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना पुरविते, अशी पालकांची धारणा आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्नही केले जात नाहीत. नावावरून शाळांकडे आकर्षित होऊ नये. नाव हे एक ब्रँड आहे, असे नाही. यासाठी पूर्ण शहानिशा करूनच पाल्याला शाळेत टाकायला हवे. गुणात्मक दर्जा कसा आहे, यावरून शाळेचे मूल्यमापन करावे. ही सर्व जबाबदारी पालकांची आहे, असे खडकीतील पालक मदन गाडे यांनी सांगितले. शहरामध्ये शाळेचे नाव पाहूनच प्रवेश घेतला जातो. प्रवेशाच्या वेळी पालकांकडून मोठ्याप्रमाणात फी घेतली जाते. अनेकवेळा मोठ्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. पण प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पाल्याची प्रगती पाहिली की आपण प्रवेश घेऊन मोठी चूक केल्याचे पालकांच्या लक्षात येते. पण वेळ आणि पैसा निघून गेलेला असतो. त्यामुळे अनेक पालक हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)