शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वलवण गोविंदा पथकाने फोडली लोणावळ्यातील मानाची हंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 15:05 IST

लोणावळा शहरातील मानाची पहिली हंडी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वलवण गोविंदा पथकाने सहा थर रचत फोडली.

लोणावळा : लोणावळा शहरातील मानाची पहिली हंडी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वलवण गोविंदा पथकाने सहा थर रचत फोडली. लोणावळा शहरातील या दहीहंडी महोत्सवात यंदा मुंबई येथिल 38 व लोणावळा शहर परिसरातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी दहीहंडी सोबत प्रथमच पारंपारिक खेळाला चालना मिळावी याकरिता ढोल लेझिम खेळाच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच पथकांनी सहभाग नोंदविला होता. दहीहंडी फोडण्याकरिता फायनल राऊंडमध्ये नऊ संघ होते. यापैकी चवथ्या क्रमांकावर असलेल्या वलवण पथकाने सहा थर लावत हंडी फोडली.      मावळ वार्ता फाऊंडेशन, लोणावळा शहर पत्रकार संघ, राजकिय पक्ष व विविध संघटना यांच्या संयुक्तरित्या शहरात गत तेरा वर्षापासून या मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात येते. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगर‍ाध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष नविन भुरट, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र चौहान, स्वामी समर्थ प्रमोटर्सचे किरण गायकवाड, रमेश पाळेकर, प्रमोद गायकवाड यांच्यासह विविध म‍न्यवरांच्या हस्ते हंडीचे पुजन करत दहीहंडी सोहळ्याला दुपारी सुरुवात करण्यात आली. शहरातील या हंडीला सलामी देण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण, डोबिंवली भागातील 38 संघ आले होते. त्यासह स्थानिक 12 संघांनी या सोहळ्यात रंगत आणली.

       ढोलताशे पथकांचे सादरीकरण पाहण्याकरिता नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली होती. अतिशय शिस्तबध्दपणे व शांततेमध्ये हा सोहळा पार पडला. मावळचे खासदार श्रीरंग ब‍ारणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे, तळेगावचे मा.उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी सोहळ्याला भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री टिना गोविंदा आहुजा हिने देखिल लोणावळ्यात येथे गोविंदाना शुभेच्छा दिल्या.   

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDahi Handiदही हंडी