शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळ झाली नगरपंचायत, ग्रामपंचायतीचे सदस्य होणार नगरसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:20 IST

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शनिवारी अधिसूचना जारी केली.

वडगाव मावळ : गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शनिवारी अधिसूचना जारी केली.मावळ तालुक्यात तळेगाव व लोणावळा नगर परिषद आहे. त्यानंतर तालुक्यात वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आहे. त्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते व पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. परंतु, मार्च ते मे २०१८ मुदत संपणाºया ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या यादीत वडगावचे नाव आल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता.नगरपंचायत जाहीर झाल्यामुळे पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती असलेल्या वडगाव शहराच्या विकासाला वेग मिळणार आहे, अशी माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. या वेळी गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, अविनाश बवरे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, चंद्रशेखर भोसले, संदीप काकडे, प्रवीण चव्हाण, बंडोपंत भेगडे, नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, किरण भिलारे, सोमनाथ ढोरे, अनंता कुडे, किरण म्हाळसकर, तुकाराम काटे, महिंद्रा म्हाळसकर, नारायण ढोरे आदी उपस्थित होते़नगराध्यक्ष कोण ?वडगाव ग्रामपंचायतची स्थापना १९२२ रोजी झाली होती. आता त्याचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने पहिला नगराध्यक्ष कोण होणार? कोणता पक्ष पहिली सत्ता स्थापन करणार याकडे तालुक्याचे लक्ष्य लागले आहे. वडगाव शहराची पहिली नगरपंचायत निवडणूक आम्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन लढणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. नगरपंचायत झाल्याने हरित पट्टा कमी होऊन चटई क्षेत्रात दुपटीने वाढ होणार असल्याने होऊ घातलेल्या गृहप्रकल्पास सुगीचे दिवस येणार येणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड