शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपा पदाधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 06:18 IST

मावळ लोकसभेच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास भाजपा काम करणार नाही, असा इशारा देणारे पत्र नेत्यांना दिले आहे.

पिंपरी : मावळ लोकसभेच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास भाजपा काम करणार नाही, असा इशारा देणारे पत्र नेत्यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात जुंपली आहे. शिवसेनेने भाजपाच्या टीकेला उत्तर दिले असून, बारणेंविरोधात बोलणाºया नगरसेवकांचा बोलविता धनी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेवून वैयक्तिक स्वार्थापोटी पत्रकबाजी सुरू आहे, असा पलटवार शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला आहे.पिंपरी-चिंचवड शहराच्या दौºयावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाच्या नगरसेवकांनी पत्र देऊन बारणे यांच्या उमेदवारीस विरोध दर्शविला आहे. शिवसेनेच्या पराभवास भाजपा कार्यकर्त्यास जबाबदार धरू नये, असेही पत्रकात म्हटले होते. त्याला शिवसेना पदाधिकाºयांनी आज आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.देशात शिवसेनेचा नाही, तर भाजपाचा पंतप्रधान होण्यासाठी युती आवश्यक आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास छुपी मदत करण्याचा स्पष्ट हेतू असल्यानेच पत्रकबाजी सुरू केली आहे. निवडणुकीत युती होईल किंवा नाही अजूनही स्पष्ट नाही. युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांच्या समोर राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपावासी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वाश्रमीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच अशा प्रकारची पत्रके नेत्यांना देऊन ते प्रसिद्धी मिळवत आहेत, असे शिवसेना पदाधिका-यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.निवेदनावर शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभाप्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोºहाळे, सरिता साने, अनिता तुतारे, रोमी संधू यांची स्वाक्षरी आहे.महापालिकेतील अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्यावेमावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार बारणे यांनी मतदार संघातील काम आणि लोकसंपर्क याचा भाजपाने धसका घेतला आहे. यातून हवालदिल झालेल्या एका भाजपा नेत्यानेच नगरसवेकांना ढाल केले आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नितीन गडकरी यांना भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी, हा सल्ला देण्यापेक्षा महापालिकेतील चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याकडे लक्ष घालण्यास भाग पाडणे आवश्यक होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस