शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

काळेवाडी फाट्यावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:58 IST

काळेवाडी फाट्यावरून रहाटणीकडे जाणाºया रस्त्यावरच रिक्षा लावतात. त्यामुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होतो.

पिंपरी : शहरामध्ये वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. आज शहरातील चौकांची स्थिती अतिशय गंभीर आहे. काळेवाडी फाटा हा शहरातील महत्त्वपूर्ण चौक आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. त्याचप्रमाणे रस्त्यालगतच अनधिकृत बांधकामे केली होती. मात्र अतिक्रमण विरोधी पथकाने या अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यामुळे थोडे दिवस काळेवाडी फाट्याने मोकळा श्वास घेतला. मात्र आता हातगाडीधारक, रिक्षा, छोटे-छोटे व्यावसायिक त्याठिकाणी अतिक्रमण करत आहेत.अतिक्रमणधारकांमध्ये हातगाडीवाल्यांची संख्या जास्त आहे. औंधकडून काळेवाडी फाट्याला येणाऱ्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येते. काळेवाडी फाट्याकडून औंधकडे जाणाºया रस्त्यावर हातगाडीधारक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतात. बºयाच वेळा रस्त्यामध्येच हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

काळेवाडी फाट्यावरून रहाटणीकडे जाणाºया रस्त्यावरच रिक्षा लावतात. त्यामुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होतो. रहाटणीकडून काळेवाडी फाट्याकडे येणाºया रस्तावर भाजीविक्रेते मोठ्या संख्येने असतात. भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक येतात. यातील बेशिस्त ग्राहक दुचाकी, चारचाकी रस्त्यावरच पार्किंग करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. काळेवाडी फाटाकडून डांगे चौकात जाणाºया रस्त्यावर पुलाखाली वाहने लावली जातात. बºयाच वेळा वाहने रस्त्यावरच असतात.डांगे चौकातून काळेवाडी फाट्याकडे येणाºया रस्त्यावर त्या ठिकाणी असलेले दुकाने, दवाखाना, कार्यालयांमध्ये येणाºयांच्या दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच लावली जातात. काळेवाडी फाट्यावरून थेरगावला जाणाºया रस्त्यावर चारचाकी वाहने लावण्यात येतात. काळेवाडी फाट्यावर बीआरटीचा मार्ग देखील आहे. अनेक वेळा बीआरटीची बस चौकातच बंद पडते. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. काळेवाडी फाट्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण कमी प्रमाणात केले असेल, तरी देखील काळेवाडी फाट्यावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. काळेवाडी परिसरातील अनेक ठिकाणचे पदपथ गायब झाले आहेत. औंधकडून काळेवाडीला येणाºया रस्त्यावर पदपथ नाहीत. त्यामुळे पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई करुन पदपथ मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी आहे.रहाटणीकडून काळेवाडी फाट्यावर जाण्यासाठी बºयाच वेळ लागतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर सायंकाळी फळ विक्रेते, भाजी विके्रते पदपथावर ठाण मांडतात. त्यामुळे वाहनांना रस्त्याने जाता येत नाही. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहने लावली जातात.- वैभव सूर्यवंशी, तरुणकाळेवाडी फाट्यावर जायचे म्हणजे जीव मुठीत धरूनच जावे लागते. रस्त्यांनी वाहने अतिशय वेगाने जातात. पदपथावर विके्रते दुकान थाटून ठाण मांडतात. त्यामुळे पदपथावरून चालणे शक्य होत नाही. रस्त्याने चालण्याची भीती वाढते. पदपथ काही ठिकाणी आहे, तर काही ठिकाणी नाहीत. सिग्नल ओलांडून जाताना बºयाच वेळा अनेक अडचणी येतात. सिग्नल वाहनांसाठी बंद झाला तरी दे)खील अनेक वाहन चालक भरधाव वाहन चालवितात. पादचाºयांनी रस्ता कसा ओलांडायचा.- प्रेरणा जोशी, तरुणीकाळेवाडी परिसरात रस्त्याला वाहने बेशिस्त पद्धतीने लावण्यात येतात. त्यामुळे गाडी चालवताना कसरत करावी लागते. कारण एखाद्या गाडीला धक्का लागला, तर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. हातगाडीधारक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. बºयाच वेळा रस्त्यावरच हातगाडी लावण्यात येते व वाहतूककोंडी निर्माण होते.- नीलेश परदेशी, नागरिककाळेवाडी फाट्यावर समस्या गंभीर४काळेवाडी फाटा या ठिकाणी वापरासाठी असलेला रस्ता प्रशस्त आहे. मात्र बेशिस्त पार्किंगमुळे या चौकात वाहतूककोंडी होते. चौकाच्या चारही बाजूंनी बेशिस्त पार्किंग केले जाते. त्याचप्रमाणे रिक्षा रस्त्यावरच लावल्यामुळे चारचाकी वाहनास अडथळा निर्माण होतो. विरुद्ध दिशेने वाहन चालवून बेशिस्त वाहनचालक इतर वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड