शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे विद्यार्थ्यांना त्रास

By admin | Updated: November 18, 2016 04:56 IST

संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना शाळेसमोर अनेक वाहने, रिक्षाचालक रिक्षा बेशिस्तपणे लावत असल्यामुळे अनेक वेळा

नेहरुनगर : संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना शाळेसमोर अनेक वाहने, रिक्षाचालक रिक्षा बेशिस्तपणे लावत असल्यामुळे अनेक वेळा शाळेसमोर वाहतूककोंडी निर्माण होत असल्यामुळे याचा त्रास विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना सहन करावा लागत आहे. संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना विद्यालयासमोर दररोज दुपारी ११.३० ते १२.३० शाळा सुटताना व शाळा भरताना शाळेसमोर मुख्य रस्त्यावर अनेक वाहनचालक अनेक बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे वारंवार वाहतूककोंडी निर्माण होते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना शाळेतून घरी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संत तुकारामनगर येथील गोल भाजी मंडई ते यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने चारचाकी वाहने, रिक्षावाले, दुचाकीधारक फेरीवाले भर रस्त्यावर गाड्या बेशिस्तपणे लावत असल्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने दुभागला जातो. यशवंतराव चव्हाण रुग्णालय, भारतीय जैन संघटना शाळा, आचार्य अत्रे रंगमंदिर आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर कार्यक्रमाला येणारे अनेक राजकीय नेते, मान्यवर, इतर नागरिक वाहने याच मुख्य रस्त्यावरच आपली वाहने बेशिस्तपणे लावत असल्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. या रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या शाळेच्या वेळी दुपारी ११.३० ते १२.३० दरम्यान व सायंकाळी ५.३० सुमारास शाळेतून घरी जाताना व शाळेत येताना विद्यार्थांना या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयाच्या प्राचार्या विजया चव्हाण म्हणाल्या, ‘‘ आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रमासाठी आलेले अनेक राजकीय नेते, नागरिक विद्यालयाच्या प्रवेशद्वार व आवारासमोरच आपली चारचाकी वाहने बेशिस्तपणे लावतात. याचबरोबर फेरीवाले व अनेक रिक्षावाले आपल्या रिक्षा बेशिस्तपणे उभ्या करीत असल्यामुळे दुपारी ११.३० ते १२.३० व सायंकाळी ५.३० या वेळी अनेक वेळा वाहतूककोंडी निर्माण होते. याचा त्रास शाळा सुटल्यानंतर अथवा शाळा भरण्याची वेळी होत आहे. (वार्ताहर)