शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहन नोंदीचे गौडबंगाल, अपघातग्रस्तांवर होतोय अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:25 IST

शहरात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या घटना घडतात. अपघातात एखाद्याचा जीव जातो.

पिंपरी : शहरात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या घटना घडतात. अपघातात एखाद्याचा जीव जातो. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनेचे कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रीकरण झालेले असूनही त्या अज्ञात वाहनांचा पोलिसांकडून तपास होत नाही, याबद्दल नागरिक संताप व्यकत करीत आहेत.बहुतांश घटनांमध्ये एखाद्याचा मृत्यू होतो, अशा वेळी ठोकर देऊन गेलेले वाहन अज्ञात असल्याची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किरकोळ अपघात घडून येतो, त्यात एखाद-दुसरी व्यक्ती किरकोळ जखमी होते. त्या वेळी अपघातातील वाहनाची, वाहनचालकांची इत्थंभूत माहिती पोलिसांना प्राप्त होते. मात्र अपघातात ज्या वेळी व्यक्ती दगावते, त्या वेळी मात्र अपघातातील वाहन हे अज्ञात असल्याची नोंद होताना दिसून येते. पोलिसांच्या या कार्यपद्धतीबद्दल नागरिक संशय व्यक्त करीत आहेत.एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघात स्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होतात. अपघातात ठोकर देणारे आणि एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया वाहनाचा तपशील मात्र कोणाकडे मिळत नाही. पोलीससुद्धा बहुतांश अपघाताच्या घटनांमध्ये अज्ञात वाहनचालक अशीच नोंद करून गुन्हा दाखल करून मोकळे होतात. अपघातग्रस्त वाहनचालकाला कायदेशीर कारवाईच्या ससेमिºयातून सुटका मिळावी, या उद्देशाने असे प्रकार घडू लागल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.- भूमकर चौक, वाकड येथे गत महिन्यात ९ नोव्हेंबरला गजानन रामचंद्र मुळे या २५ वर्षे वयाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. वाकड पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली. त्याचबरोबर अज्ञात वाहनाची धडक असा त्यात उल्लेख केला. महिनाभराचा कालावधी उलटून गेला, तरी वाकड पोलिसांना अज्ञात वाहनाचा तपास लागलेला नाही. परिसरातील सीसीटीव्हीत अपघात कैद झाला असावा, फुटेज तपासून अज्ञात वाहनाचा, वाहनचालकाचा शोध घ्यावा, अशी मागणी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले चुलते दिगंबर शंकरराव मुळे यांनी केली आहे. अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध का लागत नाही असा मुद्दा उपस्थित करणारे निवेदन त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना दिले आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी आहे. मात्र पोलिसांकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड