शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फलकांवरून प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:32 IST

शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये जुंपली आहे. महापौर, स्थायी समिती आणि पक्षनेत्यांनी सांगूनही प्रशासन कारवाईत कुचराई करीत आहे, याबाबत सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे

पिंपरी : शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये जुंपली आहे. महापौर, स्थायी समिती आणि पक्षनेत्यांनी सांगूनही प्रशासन कारवाईत कुचराई करीत आहे, याबाबत सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी बैठक घेऊन संबंधित विभागाच्या अधिका-यांना फैलावर घेतले. अधिकारी कारवाईत कुचराई करीत असतील त्यांच्यावरही कारवाई करा, कारवाईत अडथळा आणणाºया नगरसेवकांवरही कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत.

अनधिकृत बांधकामांबरोरच शहरातील अनधिकृत फलकांचाही प्रश्न गंभीर आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल आयुक्त दालनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आकाश चिन्ह परवाना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर काळजे म्हणाले, व्यावसायिक दुकानांवरील फलकाचे आकारमान ठरले आहे. परंतु, त्याची अमंलबजावणी होताना दिसून येत नाही. दुकानांवर भले मोठे फलक लावले जातात. या फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा. फलकांबाबत नियमावली तयार करून त्याची अमंलबजावणी करावी. शहराच्या विद्रूपीकरणात भर घालणाºया अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम तीव्र करावी. फलक काढण्यास गेल्यावर दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल करावा.’’फलकांचा आकार ठरणार?व्यावसायिक दुकानांवर लावण्यात येणाºया फलकाचे आकारमान ठरले आहे. परंतु, याचे शहरातील दुकानदारांकडून पालन केले जात नाही. दुकानावर भले मोठे फलक लावले जातात. या फलकांवर आता संक्रांत येणार आहे. शहराचे विद्रूपीकरण करणारे फलक हटविण्याच्या सूचना पालिकेतील पदाधिकाºयांनी आयुक्तांना दिल्या आहेत. त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आले आहे.स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. शहराचे विद्रूपीकरण थांबविले पाहिजे. अनधिकृत फलकांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. शहरातील अनधिकृत फलक काढण्याची कारवाई तीव्र करावी. अनधिकृत फलकांवर केलेली कारवाई सांगण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाºयांच्या एक ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये दिवसात अनधिकृत फलकांवर केलेली कारवाई टाकवी.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड