शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वार जखमी; दापोडीतील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:34 IST

पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे सीएमईच्या गेटसमोरील उड्डाणपुलावर मांजाने तरुणाचा गळा कापला.

ठळक मुद्देमांजामुळेच दोघींना गमवावा लागलाय जीव

पिंपरी : मांजाने गळा खोलवर कापल्याने एक दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. दापोडी येथील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) मुख्य प्रवेशव्दारासमोरील पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर गुरुवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.आनंद देशपांडे (रा. रावेत), असे जखमी दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. देशपांडे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गुरुवारी सायंकाळी ते त्यांच्या दुचाकीवरून पुणे येथून रावेत येथे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे सीएमईच्या गेटसमोरील उड्डाणपुलावर मांजाने त्यांचा गळा कापला. त्यामुळे त्यांनी लागलीच दुचाकी थांबविली. दरम्यान त्यांच्या पाठीमागे असलेल्या काही वाहनचालकांनी त्यांची वाहने थांबवून देशपांडे यांच्या मदतीला धावून आले. मांजाने गळा कापल्याचे लक्षात येताच मांजा तोडून हटविण्यात आला. तसेच देशपांडे यांना कासारवाडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, याबाबत नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. देशपांडे हे रावेत येथे त्यांच्या आईसोबत राहत असून, त्यांचा एक भाऊ त्यांच्या मूळगावी राहत असल्याचे समजते. 

.................................................

दोघींना गमवावा लागलाय जीवकासारवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात असताना मांजाने गळा चिरल्याने डॉक्टर तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना ७ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली होती. डॉ. कृपाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. धामणगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), असे त्या तरुणीचे नाव होते. तसेच पुणे येथे सुवर्णा मुजूमदार (रा. सिंहगड रस्ता, पुणे) या ७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुचाकीवरून जात असताना मांजाने त्यांचा गळा कापून जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड