शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धाडगेवस्तीवर राणूबाईमळा रस्त्यावर दोन जणांवर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 20:29 IST

धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. 

 चाकण  - धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना मंगळवारी ( दि. १७ ) रात्री पावणेसातच्या सुमारास धाडगेवस्ती रोडवर घडली. या घटनेत अक्षय बिरदवडे व संतोष बिरदवडे हे जखमी झाले आहेत.ओंकार दत्तात्रय बिरदवडे ( वय २१, रा. राणूबाईमळा, चाकण ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश लेंडघर, प्रतीक लेंडघर व सूरज लेंडघर ( सर्व रा. राणूबाईमळा, चाकण ) या तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०१८, भादंवि कलम ३४१, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, ४२७, आर्म ऍक्ट ४ व २७ अन्वये आज रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, मंगळवार ( दि. १७ ) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास धाडगेवस्ती येथील ओढ्याजवळ फिर्यादी ओंकार व त्याचा चुलत भाऊ प्रवीण हे दोघे दुचाकी क्रमांक ( एमएच १४ एफ व्ही ५८३८ ) वरून घरी जात असताना आकाश लेंडघर व प्रतीक लेंडघर यांनी संगनमताने त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी मारून पुढे जाण्यास प्रतिबंध करून शिवीगाळ व दमदाटी केली. प्रतीक याने त्याच्या हातातील तलवारीने ओंकार च्या पाठीवर व प्रवीणच्या कानावर, कानामागे वार करून जखमी केले. व दुचाकीवर दगड टाकून दुचाकीचे नुकसान केले. यावेळी भांड सोडविण्यासाठी आलेले संतोष बिरदवडे व अक्षय बिरदवडे यांना आकाश, प्रतीक व सुरज यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रतीक याने तलवारीने अक्षयच्या हाताच्या मनगटावर व संतोषच्या कानावर हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाChakanचाकण