शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे रस्त्यावरील संघवी क्रेनजवळ भीषण अपघात; २ ठार, ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:37 IST

मुंबई-पुणे रस्त्यावर विनोदेवाडी (साते) संघवी क्रेनजवळ  कंटेनर आणि डस्टर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवार, दि. १०) सकाळी ६च्या दरम्यान हा अपघात झाला.

ठळक मुद्देदोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी रुग्णवाहिकेच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात करण्यात आले दाखल

वडगाव मावळ : मुंबई-पुणे रस्त्यावर विनोदेवाडी (साते) संघवी क्रेनजवळ कंटेनर आणि डस्टर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवार, दि. १०) सकाळी ६च्या दरम्यान हा अपघात झाला.राकेश दक्षणामूर्ती नायडू (वय २५, रा.  एनडीए, मनीषा थिएटर मागे, शिवणे, पुणे) राहुल दत्तात्रय नागरगोजे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. दवणगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजेंद्र चांगोत्रे (वय २३, रा. एनडीए, खडकवासला), दिपांशू भारद्वाज (वय २५, रा. वाकड), अमनसिंह (वय २३, रा. लवासा, पुणे), रविकुमार प्रेमसिंग (वय २४, रा. वारजे), कंटेनर चालक लालचंद्र यादव (रा. उत्तर प्रदेश) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच १४ एफ एम ७२६१ क्रमांकाच्या कारमधून राहुल नागरगोजे, राकेश नायडू, राजेंद्र चांगोत्रे, दिपांशू भारद्वाज, अमनसिंह,  रविकुमार प्रेमसिंग हे पुणे बाजूला सुसाट निघाले असताना त्यांच्या कारचे नियंत्रण सुटल्याने पुणे बाजूला जाणाऱ्या एम एच ४३ इ ६५८६ कंटेनरला पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात राकेश नायडू व राहुल नागरगोजे यांचा जागीच मृत्यू झाला तर यात कारमधील चौघांसह कंटेनर चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना वडगाव पोलीस व रुग्णवाहिका चालक मिलिंद नवाडे यांनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा तपास पोलीस हवालदार राजेश कर्डिले करत आहे.

धोकादायक वळणविनोदेवाडी हद्दीत संघवी क्रेनजवळ धोकादायक वळण असल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होऊन बळीच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १० जानेवारी दरम्यान तीन भीषण अपघात झाले यात ४ जण मृत्यूमुखी पडले तर ८ जण जखमी झाले होते. या धोकादायक वळणाबाबत आयआरबी तात्पुरती दुरुस्ती करत असून सध्या महामार्गावरील दुभाजक दुरुस्तीच्या नावावर काढून टाकले असून सुसाट वाहने अचानक एकामार्गावरून दुसऱ्या मार्गावर आल्याने अपघात होत आहे. वडगाव येथील सेवा रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

महामार्गाच्या बळींना जबाबदार कोण? आयआरबी महामार्गावर टोल वसुलीचे काम करत असून महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड