शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तासात दोनशे वाहने रोखली, रावेत-किवळे बीआरटी, तुकाराम मुंढेंनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:52 IST

किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला.

किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. संबंधित वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित वाहनांची छायाचित्रे काढून व क्रमांक नोंदवून घेण्यात आले आहेत. गेल्या बुधवारपासून सलग तीन दिवस रावेत येथील महिलांनी केलेल्या आंदोलनाची व ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन माहिती दिल्यानंतर मुंढे यांनी सुरक्षा अधिकाºयांना प्रत्यक्ष पाहणीसाठी रावेत येथे पाठविले असल्याचे प्राजक्ता रुद्रवार व नगरसेविका संगीता भोंडवे यांनी सांगितले.किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी असणाºया चौकांत सतत अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काहीही कार्यवाही करीत नसल्याने रावेत भागातील सेलेस्टियल सिटी सोसायटीमधील महिलांनी रस्त्यावर उतरत प्राजक्ता रुद्रवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवार ते शुक्रवार सलग तीन दिवस बीआरटी लेनमध्ये घुसखोरी करणाºया वाहचालकांविरुद्ध आंदोलन केले होते. नगरसेविका संगीता भोंडवे यांनीही उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत वाहने रोखण्यास सहकार्य केले होते. आंदोलनाच्या दुसºया दिवशी पोलीस दलाची एक मोटार, भारत सरकार लिहिलेली एक मोटार, कॉँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांची एक मोटार, तसेच मावळ पंचायत समितीच्या भाजपाच्या सदस्याची मोटारही महिलांनी बीआरटी लेनमधून जाऊ दिली नाही. विविध राजकीय पुढाºयांसह इतरांच्याही मोटारी व दुचाकी बीआरटी लेनमधून जाऊ दिल्या नव्हत्या. सुरुवातीला दोन दिवसांत साडेपाचशे वाहने रोखण्यात आल्याचे रुद्रवार यांनी सांगितले होते.नगरसेविका भोंडवे, तसेच रुद्रवार यांनी मंगळवारी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची पुण्यातील कार्यालयात जाऊन भेट घेऊन रावेत येथील बीआरटीबाबत, तसेच बीआरटी लेनमधून बसव्यतिरिक जाणाºया वाहनांमुळे विविध चौकांत होणाºया अपघातांबाबत सविस्तर माहिती दिली होती.लोकमतने प्रसिद्ध केलेली बातमी दाखविण्यात आली. वाहनांची घुसखोरी रोखण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत पीएमपी प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार मुंढे यांनी बुधवारी सुरक्षा विभागाचे प्रमुख नंदकुमार जाधव यांनी किवळे ते रावेत दरम्यान बीआरटी मार्गावरील असुरक्षित चौकांची पाहणी केली.पाच ते सहा जणांच्या पथकाने रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीजवळच्या चौकात दोरी बांधून व वॉर्डन नेमून दुपारी साडेअकरा ते सव्वा वाजेपर्यंत दुचाकी व चारचाकी मोटारींवर कारवाई करून बीआरटी लेनमधून जाण्यास अटकाव केला. दुपारी बारा ते एक दरम्यान सुमारे दोनशे वाहनांचे क्रमांक नोंदवून घेण्यात आले.संबंधित वाहनांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. याचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार असून नोंदवून घेतलेले सर्व क्रमांक व छायाचित्रांच्या आधारे संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड