शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना कायम करण्यावरून भाजपामध्ये पडले दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 02:01 IST

उपसूचना : सत्ताधारी काही नगरसेवकांनी केला प्रस्तावाला विरोध

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मानधन तत्त्वावरील डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याच्या उपसूचनेवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपामध्ये दोन गट झाल्याचे दिसून आले. सत्ताधारी काही नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध केला. अखेरीस महापौर राहुल जाधव यांनी मूळ विषय तहकूब केला.

महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा झाली. विषयपत्रिकेवर १३व्या क्रमांकावर स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव होता. त्याला नामदेव ढाके यांनी वायसीएममधील मानधन तत्त्वावरील ५३ डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याची आणि महापापालिका सेवेतील प्रतिनियुक्तीवरील मुदत संपलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पंडित पद्माकर यांना कायम करण्याची उपसूचना दिली. महापौरांनी मतदान पुकारले. त्यावर आशा शेंडगे यांनी पुन्हा बोलण्याची परवानगी मागत महापौरांच्या हौदासमोर धाव घेतली. गोंधळ होण्याची शक्यता दिसताच महापौरांनी मूळ विषयच तहकूब केला. वायसीएममधील डॉक्टरांना कायम करण्याचा विषय चांगलाच गाजला. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय वादामुळे सतत चर्चेत असते. आता डॉक्टरांना कायम करण्याचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. या वर नेमका काय निर्णय होतोय. याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.वायसीएममधील दुरवस्थेला यापूर्वीचे राज्यकर्तेच जबाबदार होते. आजपर्यंत वायसीएममध्ये आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बसविले. त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. नगरसेवकांनी माहिती घेऊन बोलावे. कोणाच्या दबावाखाली जायचे नाही. हा विषय मंजूर करावा.- एकनाथ पवार, सभागृह नेतेचुकीची प्रथा पाडू नये. डॉक्टरांची जाहिरात द्यावी. नामांकित डॉक्टर येतील. हा विषय मंजूर करण्यात येऊ नये. मंजूर करायचा असल्यास मतदान घेण्यात यावे.- मंगला कदम, माजी महापौरडॉ. पंडित पद्माकर यांची महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील मुदत १७ फेब्रुवारीला संपली आहे. मुदत संपल्यानंतरही ते स्थायी समितीच्या सभेला कसे उपस्थित राहिले. केवळ नगरसेवकांनाच नियम आहेत. कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.- आशा शेंडगे, नगरसेविकाउपसूचना मंजूर करण्यात येऊ नये. त्याला माझा विरोध आहे. चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्यास न्यायालयात जाईन.- संदीप वाघेरे,नगरसेवक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाdoctorडॉक्टर