शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

 घरफोडी, वाहनचोरांच्या दोन टोळ्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 18:57 IST

पिंपरी परिसरात घरफोडी, वाहनचोरी करणाºया दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ७ एलसीडी टीव्ही, एक मोबाइल असा एकूण ७ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पिंपरी, दि. 3 - पिंपरी परिसरात घरफोडी, वाहनचोरी करणाºया दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ७ एलसीडी टीव्ही, एक मोबाइल असा एकूण ७ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरी प्रकरणात मोहम्मद रजा सेहमसुल्ला चौधरी (वय २१ रा. कुदळवाडी, चिखली) नौशाद अकबर अली शेख (वय १९ रा. मोशीरोड, चिखली) तर घरफोडी प्रकरणी सुरेश गोरख जाधव (वय २७) अविनाश उर्फ राहुल रोहिदास मोहिते (वय २७) दोघेही रा. रामनगर चिंचवड, सागर राम भडकवाड (वय २३ रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती विचारली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहनक्रमांक मोबाईल वाहन या अ‍ॅपवर टाकून माहिती मिळवली असता, दुचाकी भोसरी भागातील दुचाकी असल्याचे निदर्शनास आले. ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दोघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता ९ दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या. तसेच आरोपींनी एमआयडीसी भोसरी, पिंपरी-चिंचवड अशा विविध भागात केलेल्या ६ गुन्ह्यांची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व गुन्हे पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार विलास होनमाने, अशोक आटोळ यांच्या पथकाने दुचाकीचोरांना पकडण्याची ही यशस्वी कामगिरी केली.गस्तीवरील पोलिसांची कामगिरी, १२ गुन्हे उघडगस्तीवरील पोलिसांना ३१ जुलैला दोन संशयीत परिसरात दुचाकीवरून  फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून २ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ४४ हजार रोख रक्कम,७ एलसीडी दूरचित्रवाणीसंच ताब्यात घेतले. त्यांनी केलेले चिंचवड पोलीस ठाण्यातील चार, पिंपरी दोन, निगडी एक, चाकण दोन व भोसरी एक, असे घरफोडीचे १०,वाहनचोरीचे दोन असे १२ गुन्हे उघड झाले.