शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीच्या इमारतीसाठी दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:03 IST

बाळा भेगडे : बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांनी मांडल्या व्यथा

वडगाव मावळ : वडगाव नगर पंचायत कार्यालयाच्या जागेत अवघ्या चारच खोल्या असल्याने नगरसेवक व नागरिकांना त्याचा फटका बसू लागला आहे. याबाबतचे वृत्त १८ आॅगस्टला ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाले होते. सोमवारी सर्व नगरसेवकांनी आमदार बाळा भेगडे यांची भेट घेऊन चर्चा केली. या इमारतीसाठी तत्काळ दोन कोटी रुपये निधी देणार असल्याचे आमदारांनी जाहीर केले.

वडगाव नगरपंचायतीच्या जागी ग्रामपंचायत कार्यालय होते. त्याच ठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय सुरू झाले. इमारतीच्या खालच्या भागाचे बांधकाम करण्यात आले असून, त्या ठिकाणी चारच रूम आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी दोन लहान केबीन केली आहे. नागरिकांना, तसेच नगरपंचायत सदस्य यांना बसण्यासाठी जागा नाही. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.सोमवारी आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक सुनील ढोरे, चंद्रजित वाघमारे, प्रवीण चव्हाण, राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, सुनीता भिलारे आदी उपस्थित होते.नगरपंचायतीत बांधकाम अभियंता यांची बाळा भेगडे यांनी तत्काळ नियुक्ती करण्याचे आदेश दिले. विविध विकास कामाबाबत प्रस्ताव तयार करून ते पाठवा. त्या कामांबाबत मी तत्काळ मंजूर करून घेतो. शहराच्या विकासासाठी तुम्ही सर्वांनी महत्त्वाच्या कामाबाबत वेगवेगळे प्रस्ताव तयार करून पाठपुरावा करत राहा, तुमच्या नगसेवकांच्या बैठकीत ठराव पास झाले म्हणजे काम झाले नाही त्याचा पाठपुरावा केला तरच कामे होतात अन्यथा पाच वर्षे कधी जातील हेही तुम्हाला कळणार नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Nagar Bhavanनगरभवनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड