शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक सहज-सुलभ, पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करा : दीपक म्हैसेकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:21 IST

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून (दि. २) नामनिर्देशनपत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देआकुर्डी येथे आढावा बैठकीत केली सूचनाआकुर्डी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत मावळ मतदारसंघासाठी निवडणुकीचे कामकाज सुरू

पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील इमारतीत आढावा घेण्यात आला. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. सहज सुलभ आणि पारदर्शी निवडणूक होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना या वेळी त्यांनी केली.मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून (दि. २) नामनिर्देशनपत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक कामास वेग आला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत मावळ मतदारसंघासाठी निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यासह ह्यमावळह्णमधील सहा विधानसभा मतदारसंघातील कामकाजाबाबत समन्वय आणि नियंत्रणही येथूनच केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयात बैठक घेण्यात आली. मावळ विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, आचारसंहिता कक्षप्रमुख आदी या वेळी उपस्थित होते.मतदान केंद्र, व्हिडिओ शुटींग, भरारी पथक यांच्या सज्जतेबाबत माहिती घेण्यात आली. निवडणूक काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे, आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत मायक्रो प्लॅनिंग काय आहे, प्रत्येक मतदान केंद्रांवरील व्यवस्था, पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील मतदान केंद्रांमध्ये काय सुविधा आहेत, अशा मतदान केंद्रात दिव्यांगांसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था आहे का, प्रत्येक मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाबाबतही या वेळी आढावा घेण्यात आला. तसेच निवडणू कामकाजाबाबत अधिकाºयांना या वेळी डॉ. म्हैसेकर यांनी काही सूचना केल्या. अधिकाºयांनीही मत व्यक्त केले.  

दिव्यांग मतदारांसाठी वाहन सुविधादिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मागणी केल्यास दिव्यांग मतदारासाठी वाहन सुविधा पुरविण्यात येणार आहे. मावळ मतदारसंघातही दिव्यांगांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी वाहनांची व्यवस्था कशी करण्यात आली, याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Puneपुणेmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक