शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कच-यात घोटाळ्याचा डाव, निविदा रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:29 IST

पिंपरी : शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कामात दोनशे बावन्न कोटी रुपयांचा घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा गैरप्रकार सुरू आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

पिंपरी : शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कामात दोनशे बावन्न कोटी रुपयांचा घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा गैरप्रकार सुरू आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी पदाधिका-यांनी आयुक्तांकडे केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. ४२५ कोटींच्या रस्ते विकासातील रिंगचे प्रकरण, वाकड येथील सीमाभिंत कामातील रिंग असे प्रकरण ताजे असतानाच राष्टÑवादी काँग्रेसने सत्ताधाºयांचा कचरा घोटाळा उघडकीस आणला आहे. महापालिका दालनातीलविरोधी पक्षनेत्याच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.प्रशांत शितोळे म्हणाले,‘‘कचरा निविदेत दोन ठेकेदारांनी संगनमत करून निविदा भरल्या आहेत. छोट्या ठेकेदारांना निविदा भरता येणार नाहीत, अशा रितीने अटी-शर्तीमध्ये बदल केला. सल्लागाराने अटी-शर्तीमध्ये बदल केला आणि मर्जीतील ठेकेदारांस काम मिळावे, अशी पुनर्रचना केली आहे. या कामांमध्ये रिंग झालेली असून, ही रिंग यशस्वी होण्यासाठी भाजपाचे प्रमुख व काही पदाधिकारी यांनी प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचाराचे पद्धतशीरपणे नियोजन केले जात आहे. पैसे कसे खायचे यासाठी सल्लागार नेमले जात आहेत. या कामामध्ये शहरातील पुणे-मुंबई रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दोन कामांमध्ये प्रचंड प्रमाणात ठेकेदारांनी व सत्ताधाºयांनी मिळून मोठी आकडेवारी निश्चित केली असून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचे नियोजन सुरू आहे. भाजपाचे सांगवी, पिंपळे गुरव आणि पिंपळे निलख भागातील तीन नगरसेवक व दोन पदाधिकारी, पिंपरी, भोसरी मतदार संघासाठी अनेक नगरसेवकांना लोकसभा, विधानसभेला खर्च करण्यासाठी कचºयामधून लूट करून कोट्यवधी रुपये मिळवायचे आहेत. त्याची आकडेवारी हे काम निश्चित झाल्यास नावासह जाहीर करू, असा इशारा शितोळे यांनी दिला आहे.यामुळे वाढला निविदेचा दर : श्रावण हर्डीकर१पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कचरा संकलनाची निविदा प्रक्रियेत आहे. अंतिम झालेली नाही. पूर्वीची निविदा आणि आत्ताची निविदा यात फरक आहे. कचरा संकलनासाठीची यंत्रणा, गाड्या, मनुष्यबळ आदी सर्वच जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार आहे. त्यामुळे नऊशे रुपये दर आता वाढणार आहे. अजूनही हा दर निश्चित झालेला नाही, दरवाढ कशामुळे झाली याचाही अभ्यास सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. कचरा संकलनाची निविदा प्रक्रियेत दोनशे कोटींचा गैरव्यहार होणार आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.२ आयुक्त हर्र्डीकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने घरोघरचा कचरा उचलण्याविषयीचा विषय गेल्या सव्वा वर्षांपासूनचा आहे. बºयाच कालखंडानंतर आता नव्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत अजूनही कोणता निर्णय झालेला नाही. शहरातील कचरा उचलण्याच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठीचा प्रयत्न केला आहे. कार्यपद्धती आणि प्रणालीत बदल केला आहे. यापूर्वी कचरा संकलनासाठी महापालिकेच्या गाड्या, कॉम्पॅक्टर अशी यंत्रणा आणि मनुष्यबळावर खर्च होत होता. प्रणाली वेगळी होती. गाड्यांसाठी आपली गुंतवणूक असे. आता नवीन कामात आपण कोणतीही गुंतवणूक करणार नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड