शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:48 IST

पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते.

पवनानगर - पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते. परंतु पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.येळसे गावातील बहुतेक विद्यार्थी शिवली येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यांना या पुलावरून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शिवली, भडवली,काटेवाडी, येलघोल, धनगव्हाण, येवलेवाडी आदी गावांसाठी हा मुख्य रस्ता असून, परिसरातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ व दळणवळणाची सुविधा पवनानगर (काले कॉलनी) आहे. पुलाच्या दोन्ही बाजू ढासळल्याने नागरिक, चाकरमानी, दूध व्यावसायिक व विद्यार्थी यांना जोखीम पत्करुनच ये-जा करावी लागते. अतिशय धोकादायक झाल्याने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. ब्राह्मणोली पूल हा जुना असून डागडुजी केलेली नाही. पुलाच्या खालील बाजूचे स्टिल पखराब झाले आहे. पुलावरून पवनानगर ते पौड व आजूबाजूच्या अनेक गावांना जाता येते.पर्यटकांचे हालपवन मावळातील बहुतांश रस्ते दुरवस्थेत आहेत. पुलांचीही तशीच ्रपरिस्थिती आहे. या भागात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. खराब पूल आणि रस्त्यांचा स्थानिकांबरोबर पर्यटकांनाही बसतो. या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी या साठी शासनाने कोणत्याही चांगल्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. किमान रस्ते, पूल आणि इतर मूलभूत सुविधा जरी व्यवस्थित दिल्या तरी पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटक संख्या वाढल्याने स्थानिकांच्या व्यवसायास हातभार लागेल. शासनाच्या महसुलातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाढ होईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या