शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांच्या बदल्या, डोईफोडे नाशिकला, तर कापडणीस नागपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:56 IST

महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी तर क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे.

पिंपरी - महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी तर क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी बदलीचे आदेश काढले आहेत.सहायक आयुक्त डोईफोडे ५ आॅगस्ट २०१४ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन विभागात रुजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. त्यांची १२ फेबु्रवारी २०१८ ला लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. परंतु ते त्याठिकाणी रुजू झाले नव्हते. त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ३१ मेपर्यंत पिंपरी महापालिकेत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने अखेर त्यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे.उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले नितीन कापडणीस यांची अवघ्या तीन महिन्यांतच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभाग ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी म्हणून पदभार होता. कापडणीस यांची केवळ तीन महिन्यांत बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत ११ सहायक आयुक्त आहेत. त्यात ६ शासनाने प्रतिनियुक्तीवरील दिलेले ५ अधिकारी आहेत. डोईफोडे व कापडणीस यांची बदली झाल्याने राज्य सेवेतील दोन सहायक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत.पिंपरी महापालिकेत राज्य शासनाच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे चार सहायक आयुक्त कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, आकाश चिन्ह विभागाचे विजय खोराटे, भूमी, जिंदगी विभागाचे मंगेश चितळे हे चार अधिकारी प्रतिनियुक्तीवरील आहेत. पालिकेतील आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ब’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग आणि कामगार कल्याण विभागाचे चंद्रकांत इंदलकर असे पाच सहायक आयुक्त आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या