शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाहतुकीचे नियम तुडविले जातात पायदळी, बेशिस्त वाहनचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:50 IST

पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. पादचा-याला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. डांगे चौकात पादचा-यांची कुचंबणा होत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबवत असल्याने पादचा-यांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थेरगाव - पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. पादचा-याला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. डांगे चौकात पादचा-यांची कुचंबणा होत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबवत असल्याने पादचा-यांनी चालायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.डांगे चौकात वाहने झेब्रा क्रॉसिंगवर उभी केली जातात. त्यामुळे पादचाºयांना रस्ता ओलांडण्यात अनेक अडचणी येत आहेत. या गजबजीच्या रस्त्यांवर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च होते. या ठिकाणी वाहतूक पोलीसही केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. डांगे चौकातील सिग्नलवर एका बाजूला झेब्रा क्रासिंगचे पट्टे पुसट झालेले आहेत. दुसºया एका बाजूला झेब्रा पट्टे दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वाहने सर्रास झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबतात. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर तीन महिन्यांनी रंगवायला हवेत म्हणजे या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे स्पष्ट दिसतील. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज नवीन वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना पादचाºयांच्या सुरक्षेचा व त्यांच्या सोयी-सुविधांचा फारसा विचार होताना दिसत नाही.पादचाºयांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी लागणाºया विशिष्ट सिग्नलची संख्या शहरात बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यातही झेब्रा क्रॉसिंगच्या नियमाचे पालन करणाºयांची संख्या कमीच आहे. वाहनचालकांनी जरी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळणे अपेक्षित असले, तरी रस्ते व झेब्रा क्रॉसिंगची रचना निर्दोष असणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेले आहेत.शहरात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. रस्ता सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. त्यानिमित्त शहरात वाहतूक पोलिसांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.वाहनचालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, वाहन चालविताना मोबाईल फोनवर न बोलणे, ट्रीपल सीट न जाणे, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांवर वाहन न थांबविणे, पादचाºयांना रस्ता देणे आदी सुरक्षा घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. असे असतानाही बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत.वाहतूक पोलिसांकडून केवळ दंड वसूल करण्यात येतो. मात्र नियमितपणे शिस्त लावण्याबाबत प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे दंड भरल्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होते. केवळ रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवून वाहनचालकांमध्ये जागृती होणार नाही, असे यावरून दिसून येते. त्यासाठी वाहतूक पोलिसांना नियमितपणे प्रयत्न करावे लागतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. दंड वसूल करण्याबरोबरच पादचाºयांच्या सुरक्षेलाही वाहतूक पोलिसांनी प्राधान्य दिले पाहिजे.महापालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. चौकांचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून शास्त्रोक्त उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. वाहतूक पोलिसांवर जबाबदारी ढकलून देत महापालिकेचे अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी बेशिस्त वाहनचालकांचे फावते आणि सातत्याने वाहतूककोंडी होते. यातूनच अपघात होऊन हकनाक बळी जातात. अनेकजण जायबंदीही होतात.व्यावसायिकांचे अतिक्रमणडांगे चौकात रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. हातगाडीवाले, पथारीवाले यासह अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावरव्यवसाय थाटल्याचे दिसून येते. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील विक्रीचे साहित्य दुकानाबाहेर मांडल्याचे दिसून येते.या दुकानांसमोर ग्राहक बेशिस्तपणे वाहने पार्क करतात. त्यामुळेयेथील वाहतूककोंडीत भर पडते. तसेच पादचाºयांना चालण्यासाठीहीरस्ता शिल्लक राहत नाही. यातून पादचाºयांची कुचंबणा होते.भर रस्त्यातून ये-जा करावी लागत असल्याने पादचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्दळीचा चौकडांगे चौकात सातत्याने वर्दळ असते. हिंजवडी आणि वाकड कडून काळाखडकमार्गे या चौकात येणारी वाहने मोठ्या संख्येने आहेत. तसेच चिंचवडगावातून या चौकात येणारी वाहनेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या वाहनांचा या चौकात सकाळी आणि सायंकाळी खोळंबा होतो. परिणामी सातत्याने वाहतूक कोंडी होते. यातून काही बेशिस्त वाहनचालक इतर वाहनचालकांना अरेरावी करतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वादाचे प्रकार होतात.क्षमतेपेक्षा जास्त वाहने रस्त्यावररस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने या चौकातील रस्त्यांवर असतात. त्यामुळे रुंदीकरण केल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. पीएमपीएमएल बस, रिक्षा, दुचाकीसह अवजड वाहनांचा यात समावेश आहे. कोणत्याही प्रकारची शिस्त नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. यातच बहुतांशवेळा पीएमपीएमएल बस भर रस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अधिक अडचण निर्माण होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी