पिंपळे गुरव : नवी सांगवीतील वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी ओव्हर ब्रिजचे काम माझ्या कालखंडात झाले. त्यामुळे वाहतूक प्रश्न सुटला, असे मत नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभाग क्र मांक ३१ मधील सर्वसाधारण गटातील अपक्ष उमेदवार नवनाथ जगताप यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदार संपर्कावर जगताप यांनी भर दिला आहे. या वेळी नवनाथ जगताप म्हणाले, ‘‘मी स्थायी समितीत असताना ५० कोटी रुपये खर्च करून औंध-रावेत बीआरटी मार्गावर ओव्हर ब्रिज मंजूर केला. यामुळे सिग्नलविरहित, गे्रड सेपरेटर, सब वेचे काम पूर्णत्वास आणले. या उड्डाणपुलाला महात्मा फुले उड्डाणपूल व सब वेला ढोरे पाटील असे नामकरणाचा ठराव ही मंजूर करून घेतला. गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही विकासकामांनाच प्राधान्य देणार आहे.’’ असेही जगताप यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)
सांगवीतील वाहतूकप्रश्न मार्गी लावला
By admin | Updated: February 15, 2017 02:12 IST