शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

प्राधिकरण परिसरात वाहतूक कोंडी, आकुर्डीतील म्हाळसाकांत चौक बनतोय अपघाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:41 IST

रावेत : आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकातील विविध खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षा, स्कूल बस, विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणा-या पालकांच्या दुचाकी यामुळे येथील शाळांच्या परिसरात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.

रावेत : आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकातील विविध खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षा, स्कूल बस, विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणा-या पालकांच्या दुचाकी यामुळे येथील शाळांच्या परिसरात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी, वॉर्डन उपस्थित असतानादेखील अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा ठरणाºया वाहनांकडे आणि हातगाड्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात, असे पालकांचे व नागरिकांचे म्हणणे आहे.शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणाºया बसेस आणि पालकांच्या गाड्या या प्रवेशद्वाराच्या समोर भर रस्त्यावर उभ्या करून विद्यार्थी चढ-उतर होईपर्यंत तशाच उभ्या असतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. शाळांच्या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला वाहतूककोंडी कायम आहे. म्हाळसाकांत चौक परिसरातील शाळां समोर वाहतुकीची कोंडी नित्याची आहे. त्यामुळे विद्यार्थांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.एकाच संस्थेच्या तीन शाळा, मैदाने असूनही बेशिस्त पार्किं ग, शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेचे नियोजन नसल्याने वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. प्राधिकरणाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया म्हाळसाकांत चौकात शिशू आणि प्राथमिक विद्यालय, म्हाळसाकांत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय असून, या शाळेसमोर कायम वाहतूककोंडी दिसते. कोंडीमुळे शाळेच्या मार्गावर अनेक वाहनधारकांना श्वास रोखून वाहने चालवावी लागतात. शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेने दिलेल्या सूचनांना अनेक शाळांनी केराच्या टोपल्या दाखविल्या आहेत. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरातील शाळांनी समन्वयाने अंतर ठेवले तर वाहतूककोंडीचा हा विषय मार्गी लागू शकेल. सकाळी कामाला जाणाºयांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेऊन येणारे बसचालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे म्हाळसाकांत चौकात सगळे रस्ते सकाळी-सकाळी हाऊस फुल्ल होत आहेत. प्राधिकरण भागात अनेक शाळा, महाविद्यालये उपरस्त्यांवर किंवा दोन परिसरांना जोडणाºया रस्त्यांवर आहेत. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेस या रस्त्यांवर विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या बसेस आणि पालकांच्या गाड्यांची गर्दी असते. त्यातच सामान्य वाहतूक चालू असते.>पार्किंगची गरजदुचाकी, आॅटो रिक्षा आणि काही पालक चारचाकीमधून पाल्यांना सोडण्यासाठी येतात. त्या वेळी प्रचंड कोंडी होते. हीच स्थिती शाळा सुटल्यानंतरही असते. पार्किं गच्या ठिकाणी आॅटो रिक्षा आणि चारचाकी वाहनांचे पार्कि ंग केल्यास वाहतूककोंडी सुटू शकते. शाळे समोरच खाद्यपदार्थांच्या काही गाड्याही या कोंडीत भर घालतात. शाळांचे कर्मचारी प्रवेशद्वारावर उभे केल्यास वाहतूककोंडी कमी होऊ शकते.समन्वय साधण्याची आवश्यकताअनेक ठिकाणी स्कूल बस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. मुख्य रस्त्यावरूनच विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागत असल्याची पालकांची तक्रार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शाळेची परिवहन समिती,शिक्षण उपसंचालक कार्यालय, शहर वाहतूकनियंत्रण शाखा, पालक आणि रिक्षा व्यावसायिकांची संयुक्तपणे बैठक घेतल्यास वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढणे सहज शक्य आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.>शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जशी शाळांची आहे, त्याचप्रमाणे पालकांनीही काही गोष्टी पाळायला हव्यात. पालकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या ठिकाणी लावावीत़ शाळेने नियुक्त केलेली समिती वाहतूककोंडी होऊ नये म्हणून काम पाहत आहे. शालेय विभागाने वाहतुकीबाबत घालून दिलेल्या नियमावलीनुसार बसचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. - शैला गायकवाड, मुख्याध्यापिका, म्हाळसाकांत प्राथमिक विद्यालय>शाळे समोरील नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्याकरिता शालेय प्रशासनाने स्वतंत्र पार्किं ग व्यवस्था निर्माण करावी. हे शक्य नसेल तर आजूबाजूला उपलब्ध असणारे मैदान भाडे तत्त्वावर घ्यावे़ शालेय परिसरात सर्व बाजूने शंभर मीटर अंतरावर मोठ्या वाहनांना बंदी घालावी. तसेच उपाय म्हणून शाळांनी मुख्य चौकापासून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत स्वत:चे गार्ड नेमावेत. शाळा भरताना आणि सुटताना वाहतूक पोलिसांनी मुख्य ठिकाणी लक्ष घालून वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करावा़ - मुश्ताक मुल्ला, पालक

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस