शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: September 30, 2016 04:50 IST

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोेने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडील मार्गिकेवरील वाहतूक तब्बल

लोणावळा : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोेने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडील मार्गिकेवरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती. खोपोली महामार्ग पोलीस व आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सकाळी मुंबईकडून पुण्याच्या दिशेने सौंदर्य प्रसाधने, कपडे, स्टेशनरी आदी घेऊन येणाऱ्या टेम्पोला (एचआर ६१ बी १२४३) बोरघाटातील चढणीवर शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. त्यात टेम्पो साहित्यासह खाक झाला. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक जवळपास चार तास ठप्प झाली होती. आयआरबी कंपनीचे तीन व खोपोली नगर परिषदेच्या एका अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आल्यानंतर साडेनऊच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी सकाळचे साडेअकरा वाजले होते.अनेकदा द्रुतगती मार्गावर गाडीला अचानक आग लागणे, कंटेनर बंद पडणे यासारख्या घटना वारंवार घडतात. परंतु तातडीने ही वाहने हलविली जात नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)आयआरबी : व्यावसायिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष मागील काही दिवसांत विविध साहित्य घेऊन जाणाऱ्या अनेक वाहनांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमध्ये स्टेशनरी, परफ्युम, कपडे आदी साहित्यांची सर्रास वाहतूक केली जाते. अनेक वेळा परफ्युमच्या गॅसचा स्फोट होत असल्याने अशा वस्तंूची महामार्गावरून वाहतूक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना करूनदेखील संबंधित व्यावसायिक सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आयआरबीचे अधिकारी व महामार्ग पोलिसांनी सांगितले.