शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:59 IST

पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणा यामुळे निगडी येथील दुर्गानगर चौकात रोजच वाहतूककोंडी होत आहे

निगडी : पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणा यामुळे निगडी येथील दुर्गानगर चौकात रोजच वाहतूककोंडी होत आहे. सतत होत असलेल्या वाहतूककोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणाºया बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.या समस्येबाबत गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना होणे अपेक्षीत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांना याच्याशी देणेघेणे नाही. महापालिका व वाहतूक विभागाने या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.तळवडे येथील आयटी पार्क, भोसरी, चाकण एमआयडीसीकडून ये-जा करणारी वाहने, निगडी- यमुनानगरकडून येणारी वाहतूक यामुळे दुर्गानगर चौकात मोठी वर्दळ असते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीची समस्या येथे सातत्याने निर्माण होते. पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागत आहे. चाकण, तळवडे, भोसरी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाºया कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतूक करणारे कंटेनर, ट्रक, कंपन्यांच्या बस, मोटारी आणि दुचाकी आदी वाहनांची या रस्त्यावर रात्रंदिवस वर्दळ असते. याच चौकातून मोठी लोकवस्ती असलेल्या यमुनानगर, अजंठानगर या भागातून ये-जा करणाºया विद्यार्थी, ज्येष्ठांची संख्या मोठी आहे.निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाकडून चाकण, भोसरीकडे जाणारी अवजड वाहने या रस्त्याने भरधाव वेगात असतात. या चौकात गतिरोधक नसल्याने अशा भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. चौकात काही रिक्षाचालक भररस्त्यात रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरही वाहने बेशिस्तपणे उभी केली जाऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाºयांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालत जावे लागते. वाहतूक नियमनाऐवजी वाहनचालक वाहनचालकांकडून कारवाई करून दंड वसूल करण्यावर भर देतात. परिणामी दुर्गानगर चौकातील वाहतूक ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येते.