शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीतील 'अर्बन स्ट्रीट 'ला व्यापाऱ्यांचा विरोध; मनमानी पध्दतीने काम सुरू असल्याचा केला आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 20:00 IST

भोसरीतील नागरिकांच्या सोयी व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार

भोसरी : भोसरीमधील वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासठी 'अर्बन स्ट्रीट ' करण्याचे प्रस्तावित असून , मात्र याला आता येथील व्यापारी व स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी विरोध केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने हे काम सुरू असून, आमचे म्हणणे ऐका,आमच्या मागण्या मान्य करा असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याबाबत नुकतीच भोसरीमध्ये बैठक पार पडली. 

यावेळी माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक रवी लांडगे, व्यापारी कैलास  भाबुर्डेकर, नथु शिदे , भानुदास लांडगे, मदन कर्नावट ,राम फुगे, संजय उदावंत, स्थानिक नागरिक अजित रमेश गव्हाणे , बाळासाहेब लांडगे, हेमंत खराबे ,अविनाश फुगे,कैलास लांडगे, दत्तात्रेय गव्हाणे व अजित फुगे ,सागर काकडे तसेच इतर अनेक व्यापारी उपस्थित होते.

भोसरी पुलाखालील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आता या भागातील पादचाऱ्यांचा, नागरिकांच्या सोयीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहेत. विदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर भोसरी उड्डाण पुलाखालील वाहतुकीचे 'अर्बन स्ट्रीट डिझाईन' संकल्पनेअंतर्गत नियोजन केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, गार्डन, ई- टॉयलेट आदी प्रकल्प हाती घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

मात्र आता व्यापाऱ्यांनी या प्रकल्पात मनमानी होत असल्याचा आरोप केला आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील फूटपाथची रुंदी वाढविली आहे. पुलाखाली पार्किंग करण्याचे नियोजन असताना आता हॉकर्स  साठी  जागा देण्याचे निश्चित केले आहे. हे प्रकल्पाच्या नावाखाली थोपविले जात आहे. असेही या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे .

----व्यापारी काय म्हणतात... प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला मात्र विश्वासात घेतले नाही व्यापारी, जागामालक यांना कल्पना दिलेली नाही.  काय कामे सुरू आहेत हे कामगार, अधिकारी दुकानाच्या समोर आल्यावर समजते. पुणे- नाशिक रस्त्यावर भविष्यात मेट्रो निओचे नियोजन करण्यात आले आहे.  मात्र हा प्रकल्प झाल्यानंतर पुन्हा हे काम बासनात गुंडाळून ठेवावे लागेल.   दुकानासमोरील फूटपाथची रुंदी वाढविनार असून रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे त्यामुळे आम्हला व्यवसाय करताना अडचणी येणार आहे. 

-------आमच्या शंका, अडचणी आणि समस्या समजून घेतल्याशिवाय काम करू देणार नाही. नक्की हा प्रकल्प काय आहे हे समजून सांगावे, दुकाने, पथारी व्यावसायिक यांचे नुकसान होईल का हेही पाहावे लागेल. तोपर्यंत काम करू नये.-रवी लांडगेनगरसेवक , ---------

 मनमानी कारभार सुरू आहे, विरोध असताना रेटून नेऊन काम लादले जात आहे.पथारी व्यावसायिकाना उडडाणपुलाच्या खाली जागा देण्याचे नियोजन केले जात आहे . मग प्रस्तावित पार्किंगचे नियोजन कुठे करणार . -अजित गव्हाणे माजी स्थायी समिती सभापती ---------या प्रकल्पाबाबत व्यापारी , स्थानिक नागिरक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल , प्रकल्प आराखडा समजून सांगू . त्यांचे समाधान झाल्याशिवाय काम करणार नाही . एस. बी. साळी उपअभियंता , पिंपरी चिंचवड मनपा

टॅग्स :bhosariभोसरीroad transportरस्ते वाहतूकbusinessव्यवसाय