शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशत माजविण्यासाठी टोळक्याकडून तोडफोड, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:58 IST

उसने पैसे दिले नाहीत तसेच अविनाश धनवे यास भाई म्हणाला नाही या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दिघी फाटा परिसरात दुकाने, स्टॉल यांची तोडफोड केली. दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी : उसने पैसे दिले नाहीत तसेच अविनाश धनवे यास भाई म्हणाला नाही या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दिघी फाटा परिसरात दुकाने, स्टॉल यांची तोडफोड केली. दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास देहू फाटा येथे घडला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.आरोपींनी चहा स्टॉल, स्नॅक्स सेंटर, पान शॉपची लोखंडी कोयते, लाकडी बांबूनी तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सिद्धेश्वर सीताराम गोवेकर (वय २७), बालाजी मारुती वाळुंज (वय २२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचे साथीदार अविनाश धनवे, वसीम शेख, मयूर मडके, प्रशांत लोहकरे यांच्यासह चार ते पाच अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पप्पू ऊर्फ अभिमन्यू शितोळे (वय २८, देहू फाटा, आळंदी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पप्पू शितोळे याचे देहू फाटा येथे बारामती चहा स्टॉल आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पप्पू याच्या चहा स्टॉलवर आले होते. त्यांनी पप्पू याच्याकडे उसने पैसे मागितले होते. परंतु, पैसे देण्यास पप्पूने नकार दिला. याचा आरोपींना राग आला. दहा जणांच्या टोळक्याने हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके घेऊन तिथे आले. पप्पू याचे चहा स्टॉल, ज्ञानेश्वर मोरे यांचे स्नॅक्स सेंटर, पान शॉप, रसवंतीगृह आणि माऊली पाटील यांच्या स्नॅक्स सेंटरची तोडफोड केली. यामध्ये अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दिघी ठाण्याचे फौजदार जे. एस. शेंडगे तपास करत आहेत.सांगवीत एकास टोळक्याकडून मारहाणपिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवसाई सोसायटी, पिंपळे सौदागर येथे शुभम कवटे या आरोपीने अन्य साथीदारांच्या मदतीने शत्रुघ्न पालमपल्ले (वय २१, रा. पिंपळे सौदागर ) याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कवटे, सुमीत सोमवंशी, दीपक धोत्रे, आनंद संगमे व अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम़ के़ आहेर तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा