शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी तीनच निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:47 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाअंतर्ग प्रस्तावित असलेल्या दोन मार्गिकांपैकी शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी अवघ्या तीनच

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाअंतर्ग प्रस्तावित असलेल्या दोन मार्गिकांपैकी शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी अवघ्या तीनच कंपन्यांनी निविदा भरल्या असून पूर्वपात्रता फेरीत त्या निविदा पात्र ठरल्या आहेत.तब्बल ८ हजार ६०० रुपयांच्या शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरच्या २३.३ किलोमीटरच्या उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनांकडून तीन हजार कोटींचा निधी मिळणार आहे. उर्वरित निधी उभा करण्याचे मोठे आव्हान पीएमआरडीएसमोर आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या जागतिक निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १० मे आणि २५ मे अशी दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने २२ जूनपर्यंत तिसरी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आयआरबी, आयएलएफएस आणि बोलीपूर्व (प्री-बिड) टाटा रिएल्टी-सीमेन्स या कंपन्या पुढे आल्यानंतर त्यांनी निविदा पूर्वपात्रता फेरी पूर्ण केली आहे. आणखी कंपन्या पुढे येण्याची वाट पाहण्यात येत आहे.1आणखी कंपन्या आल्यास बोली लावून एका कंपनीची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या कंपनीकडून आॅक्टोबरमध्ये निविदा भरली जाईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या व्यवहार सल्लागाराची मदत घेऊन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. हा करार ३५ वर्षांसाठी करण्यात येणार असल्याचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. हा प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्यात येईल. कंपनीला स्थावर मालमत्ता भाड्याने, व्यावसायिक वापराकरिता देण्यात येणार आहेत.2या जागांवर जादा चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे. यामधून कमी पडणारा निधी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने २० टक्के निधीला मान्यता दिली असून कंपनीला प्रकल्पासाठी भूसंपादन करून देण्यात येणार आहे. एकूण जागेपैकी १५ टक्के जागा वाहनतळ, मेट्रो स्थानकासाठी संपादित करण्यात येणार असून मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात येतील.