शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुरक्षेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:48 IST

नियम पायदळी तुडवून प्रवासी चिंचवड स्टेशनवर पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वेरुळ ओलांडतात. सुरक्षा यंत्रणांची उदासीनता आणि रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी याला कारणीभूत आहे.

चिंचवड : नियम पायदळी तुडवून प्रवासी चिंचवड स्टेशनवर पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वेरुळ ओलांडतात. सुरक्षा यंत्रणांची उदासीनता आणि रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी याला कारणीभूत आहे. याला जोड मिळते ती प्रवाशांच्या निष्काळजीपणाची. या सर्व प्रकारात फरपट होते ती सुरक्षेची. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.उद्योगनगरीतील चिंचवड स्टेशन अत्यंत वर्दळीचे आणि महत्त्वाचे आहे. या स्टेशनवर काही लांब पल्ल्याच्या गाड्या, तसेच सर्व लोकलना थांबा आहे. नियमित प्रवासी, विद्यार्थी व कामगारवर्गाची नेहमीच गर्दी असते. मात्र बरेच प्रवासी नियमांचे पालन करीत नाहीत. मनमानी पद्धतीने वागतात. या स्टेशनवर चार फलाट आहेत. स्टेशनवर प्रवेश करताना फलाटाच्या दोन्ही बाजूंना तिकीट खिडक्या आहेत. नियमित प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या स्टेशनवर रेल्वेरुळ ओलांडण्यासाठी एक पादचारी पूल आहे; मात्र अनेक प्रवासी पुलाचा वापर न करता जीव धोक्यात घालतात आणि रेल्वेरुळ थेट ओलांडतात.अशा प्रकारांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. असे असतानाही याबाबत सुरक्षा यंत्रणा, रेल्वे प्रशासन किंवा प्रवाशांकडूनही खबरदारी घेण्यात येत नाही, ही गंभीर बाब आहे. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात येते; मात्र ती केवळ तात्पुरती. प्रवाशांच्या बेफिकिरीपुढे ही कारवाई निष्प्रभ ठरत आहे. परिणामी धोका पत्करून प्रवासी बिनदिक्कतपणे रेल्वेरुळ ओलांडतात.फलाटावर लोकल आल्यानंतर अनेक प्रवासी चालू गाडीतून उतरतात. अनेक जण गाडी थांबण्यापूर्वी गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. या गडबडीत अनेक जण पडून जखमी होत आहेत.पिंपरी स्टेशनवरही अशाच प्रकारची समस्या आहे. स्टेशनला लागून भाजी मंडई आहे. भाजी मंडईतून बाहेर पडणारे नागरिक रेल्वे रुळ ओलांडतात. पादचारी पुलाचा वापर प्रवासी आणि येथील नागरिकांकडून करण्यात येत नाही. त्यामुळे येथे अनेकदा अपघात झाले आहेत. रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही चिंचवड आणि पिंपरी स्टेशनवर सुरक्षेबाबत उपाययोजना नाही.