शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमधील नवीन कोरोनाचे तीन रुग्ण कोरोनामुक्त; चौदा दिवस 'होम क्वारंटाईन'बंधनकारक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:02 IST

कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला होता.

पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील एकूण सात जण पॉझिटिव्ह आढळले होते. तर त्यातील तीन जण नवीन कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. आज एकुण सातही जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहेत.

चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड मार्चमध्ये शहरात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर ऑक्टोबरपासून रुग्णसंख्येत कमी होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला होता. सुरूवातीला ब्रिटनहून आलेल्या २६८ जणांची तपासणी केली. त्यापैकी २७ डिसेंबरला सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असताना त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर हे रुग्ण नवीन कोरोनाचे आहेत किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रवाशांच्या घशातील द्रवाचे नमुने एआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या सातही जणांवर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना पॉझिटिव्ह असले तरी या रुग्णांची प्रकृती ठणठणीत होती. या रुग्णांची पुर्नतपासणी केली. त्यात त्यांचे दोन दिवस कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील नवीन स्टेन आढळलेल्या एकाच कुटुंंबातील पती पत्नी आणि दोन वर्षांच्या लहान मुलाचा समावेश होता............ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांची प्रकृती ठणठणीत असल्याने सतरा दिवसांचे आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी सातही जणांना डिस्चार्ज दिला आहे. मात्र, त्यांना आणखी चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.डॉ. लक्ष्मण गोफणे (वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंड