शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध; पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरात कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: April 22, 2024 09:34 IST

पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले...

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. यात पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले.  सलमान रमजान शेख (२८, रा. साई श्रध्दा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), सतीश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार (२१, रा. खंडोबामाळ, आंबेडकरनगर, चाकण ता. खेड), शुभम रुपसिंग भाट (२६, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव, पुणे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

पिंपरी, हिंजवडी, वाकड परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सलमान रमजान शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोयत्यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, चोरी व बेकायदेशिररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे नऊ गंभीर गुन्हे केले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे पिंपरी पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

चाकण परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सतीश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह गंभीर दुखापत, खंडणी गोळा करणे, यासारखे तीन गंभीर गुन्हे केले. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव चाकण पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

हिंजवडी परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार शुभम रुपसिंग भाट याने गावठी हातभट्टी तयार करणे, विक्री करणे अशा प्रकारचे सहा गुन्हे केले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव हिंजवडी पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

या तीनही प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एमपीडीए (महाराष्ट्र जातीय, समजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८०) कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. यंदा पोलिस आयुक्तालय हद्दीतील सात गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई झाली. ही प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिस आयुक्त चौबे यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChakanचाकण