शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत  एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:55 IST

ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोसायटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दुपारी एकच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोसायटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दुपारी एकच्या सुमारास घडली़ पाच महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. चेतल हेमकर्ण पाटील (वय २५, रा. ताथवडे) असे विवाहितेचे नाव असून आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याशिवाय चिखलीत आणि दापोडीत आत्महत्येच्या आणखी दोन घटना दिवसभरात घडल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ताथवडे येथे राहणाºया चेतलचे पती हेमकर्ण कंपनीत गेले असता दुपारी ती आणि सासू दोघीच घरी होत्या. सदनिकेत केबल नेटवर्क समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून तिने टेरेसची चावी घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील रहिवासी बाहेर आले. त्यांना चेतल जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे दृश्य पहावयास मिळाले. येथून जाणारा एक टेम्पोचालक, काही तरुण, सोसायटीतील सुरक्षारक्षक यांनी तिला उचलून तत्काळ वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चेतलचे आयटी अभियंता असलेल्या हेमकर्णशी पाच महिन्यांपूर्वी (फेब्रुवारीत) लग्न झाले होते. तिने एमटेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मूळचे नगर जिल्ह्यातील पाटील कुटुंबीय ताथवडे येथे भाड्याने राहत होते.दुसरी आत्महत्येची आणखी एक घटना दापोडीत घडली. अनिषा नंदकुमार ठाकुरे (वय १६, रा. दापोडी), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही या नैराश्येपोटी तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमरास घडली.तिसरी घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. स्वप्निल माने असे तरुणाचे नाव आहे. स्वप्निल जाधववाडी येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. तो मिळेल ते काम करत असे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.