शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:46 IST

ओढे-नाल्यांतून ग्रामपंचायतींचे सांडपाणी सोडले जाते नदीपात्रात

- सचिन शिंदेतळेगाव स्टेशन : आंबी वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच नदीलगत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीच गटारगंगा झाली आहे. या गटारगंगेमुळे नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने जलचरांचा मृत्यू होत आहे. या नदीच्या पाण्याला दुर्गंध येत असून, नदीचे पाणीच जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. मावळ तालुक्यात इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा आदी नद्यांचे पात्र असून, पावसाळ्यात दुथडी वाहतात. मावळ तालुक्याला वरदान असलेल्या नद्यांचे पाणी अमृत मानले जात होते. त्याच नद्यांचे पाणी विष ठरले असून जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक झाले आहे .औद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास झाल्याने नागरीकरणात वाढ होत आहे. एकेकाळी ओस असलेली गावे दाट लोकसंख्येच्या शहरात रूपांतरीत होऊ लागली. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी, मैला, तसेच कचरा, ओढे व नाल्यातून पवित्र असलेल्या नदीपात्रात दिवसा ढवळ्या सोडले जात आहे.तसेच ग्रामपंचायतीचे व गृहप्रकल्पांच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रास नदीपात्रात सोडले जात आहे.इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाणारे औद्योगिक क्षेत्रातील, तसेच नागरी वस्तीतील दूषित पाणी त्वरित बंद करून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी इंदोरीमधील नागरिकांनी केली आहे.> नदीपात्रात कपडे, म्हशी, बैल, गायी, शेळ्या व मेंढ्या सर्रास धुतात. इंद्रायणी नदी गटारगंगा झाल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. जलपर्णीच्या मुळ्या सर्वत्र पसरल्याने झपाट्याने जलपर्णी वाढत असून, पाण्याला उग्र दुर्गंध येत आहे. या जलपर्णीमुळे जलचरांचा मृत्यू होत असल्याने अनेक दुर्मिळ जातींचे जलचर नामशेष होत आहेत. नदीचे दूषित पाणी पिल्याने जनावरे आजारी पडत आहेत. नागरिकांना नदीच्या पाण्यामुळे त्वचेचे आजार होत आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी मानवाला तर सोडाच जनावरांनाही पिण्यायोग्य राहिले नाही. जलपर्णीच्या विळख्यामुळे नदीचा परिसर विद्रूप झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater pollutionजल प्रदूषण