शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्यांंना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लोणावळ्यात जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 18:38 IST

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांना डोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी पाच जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलडोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी

लोणावळा : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांना डोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर कान्हू गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कारकेवस्ती कुसगाव येथिल विजय यशवंत कालेकर, विकास भाऊ कदम (रा. औंढे) व अन्य तिन अनोळखी युवक यांच्या विरोधात आर्म अॅक्ट ३ (२५), भादंवी कलम ३२३ व अन्य कलमांन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर गुंड, लहू गुंड व किसन गुंड हे रविवारी पवनानगर येथून एका लग्न समारंभावरुन घरी कुसगावला परत येत असताना डोंगरगाव वाडी येथील शिवसेना कार्यालयाच्या समोर गर्दी जमली होती, त्याठिकाणी मयुर जगदाळे यांनी विकास कदम यांची सुरु असलेली भांडणं सोडवली. गुंड व त्यांचे सहकारी देखिल भांडणं सोडविण्याकरिता गेले असता भांडणं करणारा विकास कदम यांनी ज्ञानेश्वर गुंड यांस 'तुला माहिती आहे का, मी कोण आहे' असे म्हणत शिविगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिव्या देऊ नका असे गुंड म्हणत असताना कदम याचा जोडीदार विजय कालेकर व अन्य तिन अनोळखी युवक तेथे आले त्यांनी देखिल गुंड यांना शिविगाळ करत कालेकर याने कंबरेला लावलेला पिस्तुल बाहेर काढत 'तुम्हाला खल्लास करतो' असे धमकावले. यावेळी परिसरातील लोक जमा झाल्यानंतर त्या सर्वांनी घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित ठोसर याप्रकरणी तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड