देहूरोड : शिवाजीनगर ( देहूरोड ) येथील एका ताडी अड्ड्यावर गुरुवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून १००५ लिटर ताडी जप्त केली. २४७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका महिलेला ताब्यात घेतले असून वडगाव न्यायालयाने जामिनावर तिची मुक्तता केली. राज्य उत्पादन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिटा जोसेफ (वय ५४ , रा. शिवाजीनगर , देहूरोड ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. रिटा यांना शिवाजीनगर झोपडपट्टी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये ताडीचा अवैध व्यवसाय करीत असताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून ताडी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण चोवीस हजार सातशे नव्वद आहे. (वार्ताहर)
हजार लिटर ताडी देहूरोडला जप्त
By admin | Updated: November 27, 2015 01:20 IST