शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'कट्यार पाठीत घुसली,चा त्यांनी प्रयोग केला, आम्हीही केला "आता होती गेली कोठे' चा प्रयोग: देवेंद्र फडणवीस

By विश्वास मोरे | Updated: January 7, 2024 22:07 IST

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा संपन्न 

डॉ. विश्वास मोरे 

चिंचवड- तिसरी घंटा वाजली की नाटक सुरु होते, आमचेही तसेच आहे. राजकारणामध्ये तिसरी घंटा म्हणजे आचारसंहिता लागते ती वेळ. तेव्हा आम्ही पोझिशन घेतो. एक गोष्ट खरी आहे कि, चांगल्या तालमी केल्या कलावंताना रसिकांचा आशीर्वाद मिळतो. तसेच आमचेही आहे. जे नुसतीच नाटके करतात, त्यांना लोक घरी बसवतात.२०१९ ला एक प्रयोग झाला. कट्यार काळजात नाही, तर पाठीत घुसली. त्यानंतर आम्हीही प्रयोग केला, आता होती गेली कुठे? , असे प्रयोग होताच असतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात लगावला.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळ्यात फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल,  परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, संयोजक भाऊसाहेब भोईर, मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.  सोलापूर नाट्य परिषदेकडे मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि घंटा सुपूर्द केली.  ओटीटीच्या काळात देखील नाटक संपलेलले नाही 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रेक्षकांच्या निकट जो असतो तोच खरा अभिनेता असतो. पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलावले की, टीका व्हायची पण आता चित्र बदलले आहे.  आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स कडे संवेदनशिलता नाही. कितीही आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स आलं तरी संगीत, नाट्य, कला यावर परिणाम होणार नाही. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स   मानवी संवेदना देवू शकणार नाही. मराठी रंगभूमी ही सर्वोत्तम आहे. ती टिकवावी लागेल. शाश्वत मूल्य लक्षात घेवून २१  व्या शतकातील मूल्य ओळखावी लागतील.  ओटीटीच्या काळात देखील नाटक संपलेलले  नाही. जोवर मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही."

शंभरावे नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं

''अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाला केशराचं शेत म्हटले होते, मला वाटते शंभरावे नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं,  केशरी रंग आम्हाला प्रिय आहे. सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे, राज्याचा अमृतकाळ लवकरच सुरू होईल त्या काळात नाट्य क्षेत्र नक्की कुठे असेल याची कल्पना आम्हाला येणार नाही, मात्र तुम्ही नाट्य क्षेत्रातील लोकांनी आम्हाला सांगा नेमके व्हीजन काय असावे? ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा