शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

शहरात तीन वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नाही एकही नवी बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:58 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही.

- शीतल मुंडे पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना जुन्या आणि नादुरुस्त बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर किमान एकतरी बस बंद पडलेली दिसते. शिवाय पीएमपी ताफ्यात दर वर्षी व प्रत्येक महिन्याला बस स्क्रॅप होत आहे.पीएमपीच्या ताफ्यात २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत एकही बस दाखल नाही. त्यानंतर २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत केवळ बारा नव्या बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. २०१८ मध्ये जुन्या झालेल्या आणि वैधता संपलेल्या १०२ बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या बसचा भरणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच बसचे बे्रकडाऊनचे प्रमाणदेखील अधिक आहे. रस्त्यावरील पीएमपी बस ब्रेकडाऊनची वाढती संख्या, खिळखिळ्या बस व धूर सोडून प्रदूषण वाढविणाऱ्या बस यामुळे प्रवाशांकडून बसबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या वाढलेली आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वापर करण्यात आलेल्या एकूण १६५ बस आताच्या स्थितीला पीएमपीच्या ताफ्यात आहेत. ११ ते १२ वर्षे झालेल्या १९० बस आहेत. जुन्या बसमुळे तक्रारीमध्ये वाढ होत आहे. नवीन बस खरेदीबाबत पीएमपी प्रशासन उदासीन असल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर बंद पडणाºया पीएमपी बस, ब्रेकडाऊन होण्याचे वाढलेले प्रमाण, बसमधून विचित्र आवाज येणे, बसमधून काळा धूर निघणे, बसला आग लागणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.>पीएमपी ताफ्यामध्ये भंगार बसचे प्रमाण अधिक आहे. काही भंगार बसमुळे प्रदूषणात वाढ होते. पीएमपीच्या ताफ्यात २०१३ - १४ या आर्थिक वर्षात एकही बस पीएमपी प्रशासनाने खरेदी केलेली नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षातदेखील पीएमपी प्रशासनाने बस खरेदी केली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षात पीएमपी ताफ्यात मात्र ११ बस दाखल झाल्या होत्या. त्यांनतर २०१८ च्या शेवटी २०० मीडी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. पीएमपी ताफ्यात नव्या बस नसल्याने जुन्या बसचा वापर सुरू आहे. - सुभाष गायकवाड,जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल>पीएमपीच्या बहुतांश बसची स्थिती अतिशय खराब आहे. एखाद्या बसमध्ये बसलो तरीदेखील आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार किंवा नाही, याची खात्री नसते. त्याचे कारणही तसेच आहे. पीएमपीची बस कुठेही बंद पडते. त्यानंतर दुसºया बस बदलत जावे लागते. यामुळे वेळदेखील जास्त जातो. एकतर एक-दोन तासानंतर बस येते एकतर बसला गर्दी जास्त असते. - मोहिनी पवार, प्रवासी