शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत

By विश्वास मोरे | Updated: July 18, 2024 21:25 IST

भोसरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट

पिंपरी : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडी भोसरीची जागा पवार गटाला जाणार, याबाबतची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट अस्वस्थ झाला आहे. शिवसैनिकांनी मुंबईत नेत्यांची भेट घेतली. त्यावर ''जागा वाटपाची चर्चाच नाही काळजी करू नका, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसनिकांना समजावले आहे. 

मुंबईत झालेल्या बैठकीस  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहीर, नेते रवींद्र मिर्लेकर, विनायक राऊत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील भोसरीतील नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रवेश होताच भोसरी विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाने ठोकल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत, अस्वस्थ आहेत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

त्यावर संजय राऊत यांनी अद्यापपर्यंत विधानसभेच्या जागा वाटपांबद्दल महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही चर्चा झालेल्या नाही. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाला हे ठरलेले नाही. कुणीही काहीही दावे दावे करीत असेल, तर त्याकडे लक्ष देऊ नका. आघाडीतील सर्व पक्षाचे जेष्ठ नेते निर्णय घेतील. त्यामुळे सर्वानी पक्ष संघटनेचे काम करा, अशा सूचना राऊत यांनी केल्या. माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, तुषार सहाने, परशुराम आल्हाट, सचिन सानप, अविनाश वाळके, शैलेश मोरे आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते.  ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, ' भोसरी विधानसभा हा परंपरागत मतदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आम्ही आमची भूमिका मांडली आहे.' 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Shiv Senaशिवसेना