पिंपरी : खडकी येथील मिलेट्री हॉस्पिटल येथील फायर सिस्टिममधील डबल आऊटलेट टाईप फायर हायड्रन्ट या नव्वा नऊ लाख रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी झाली. याप्रकरणी चंद्रकांत भोसले (वय ४८, रा. क्वार्टर मास्टर आॅफिस, मिलिटरी हॉस्पिटल, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे हॉस्पिटल येथे सुभेदार या पदावर कार्यरत आहेत. या हॉस्पिटलमध्ये फायर सिस्टिम बसविण्यात आलेले एकूण ३९ डबल आऊटलेट टाईप फायर हायड्रन्टपैकी ३४ नग गायब झाले. दरम्यान, हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेरयात काही अनोळखी व्यक्ती संशयितरित्या फिरताना दिसून आले आहे. या व्यक्तींनी फायर सिस्टिममधून नऊ लाख १३ हजार ३७६ रुपये किंमतीचे ३४ डबल आऊटलेट टाईप फायर हायड्रन्ट हे साहित्य चोरुन नेल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.
खडकी येथे मिलिट्री हॉस्पिटमधून सव्वा नऊ लाखांच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 20:23 IST
हॉस्पिटलमध्ये फायर सिस्टिम बसविण्यात आलेले एकूण ३९ डबल आऊटलेट टाईप फायर हायड्रन्टपैकी ३४ नग गायब झाले आहे.
खडकी येथे मिलिट्री हॉस्पिटमधून सव्वा नऊ लाखांच्या साहित्याची चोरी
ठळक मुद्दे फायर सिस्टिममधून नऊ लाख १३ हजार ३७६ रुपये किंमतीचे डबल आऊटलेट टाईप फायर हायड्रन्ट चोरीला