शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: महायुतीचे सूत्र ठरेना अन् महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटेना

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 24, 2025 16:46 IST

 पडद्यामागे राजकारण तापले; शिंदेसेनेला मोजक्याच जागा देऊन भाजपकडून पर्यायी जागांचा करेक्ट कार्यक्रम : महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव

 पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानापेक्षा अधिक तापलेले राजकारण सध्या बंद दाराआड सुरू आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचे चित्र जवळपास ठरले असताना, महाविकास आघाडीत मात्र संशय, नाराजी आणि नेतृत्वाच्या संघर्षाने वातावरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.महायुतीत भाजपने सुरुवातीपासूनच “ज्याची ताकद, त्याची जागा” हे सूत्र स्वीकारल्याने बंडखोरीची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदेसेनेला नेमक्या आणि मोजक्या जागा देऊन त्यांच्याकडील संभाव्य बंडखोरांवरही नियंत्रण ठेवले जात आहे. काही प्रभागांमध्ये ‘दुसरा पर्याय’ आधीच तयार ठेवल्याची चर्चा असून, नाव जाहीर होताच विरोध होऊ नये, यासाठी उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर आधीच संकेत दिले जात आहेत.याउलट, महाविकास आघाडीत मात्र निर्णयच होत नसल्याने अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा रिक्तपणा आणि स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा, उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्या भाजप प्रवेशाने महाआघाडीत चालले काय? अशी स्थिती आहे. स्थानिक नेतृत्वाकडे निर्णयाचा अधिकार नसणे, मुंबई-पुणे पातळीवरील नेतृत्वाकडून विलंब, तसेच “कोण लढणार आणि कोण माघार घेणार” यावर स्पष्टता नसल्यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक पातळीवरील फूट रोखण्याचे भाजपापुढे आव्हानएकूणच, भाजपने निवडणूक व्यवस्थापनावर भर दिला. मात्र, स्थानिक पातळीवरील फूट रोखण्यात यश येत नसल्याचे चित्र आहे. आयारामांना पक्षात घेण्यात धन्यता मानली जात आहे. त्यावरून प्रवेशावरून श्रेयवाद सुरू आहे. शिंदेसेना आणि भाजप यांच्यात अजूनही सुर जुळलेले नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीत नेतृत्व, समन्वय आणि विश्वास या तीन आघाड्यांवर संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र बदलते की अधिक बिघडते, यावरच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच्या फक्त चर्चा...दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असला, तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्याचे संकेत अस्पष्ट आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात जागांविषयी नुसती चर्चा सुरू आहे. उद्धवसेनेला जागा किती मिळणार, याची चर्चा सुरू आहे. जर कुठे प्रभागनिहाय समन्वय झाला, तर तो अपवादात्मक ठरेल, अशीच चिन्हे आहेत. यामुळे मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर कायम आहे. दरम्यान, मनसेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेने आघडीबरोबर जायचे निश्चित केले आहे. मनसेला किती जागा मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance struggles over seats mar Pimpri-Chinchwad municipal election prospects.

Web Summary : Pimpri-Chinchwad's municipal election sees MahaYuti streamlining, while MahaVikas Aghadi faces internal conflict, leadership voids, and distrust over seat sharing. BJP focuses on management but struggles with internal divisions. Alliances' future hinges on resolving disputes.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2025