शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभासाठी नेत्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:23 IST

मावळ तालुक्यातील नेतेमंडळीची कार्यक्रमांसाठी दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात अनेक साखरपुडे, लग्नसमारंभ होत असून, नेते मंडळी मात्र प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.

पवनानगर : मावळ तालुक्यातील नेतेमंडळीची कार्यक्रमांसाठी दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात अनेक साखरपुडे, लग्नसमारंभ होत असून, नेते मंडळी मात्र प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्याचे लोकप्रतिनिधी पंचक्रोशीत आमंत्रित दशक्रिया व तेरावा विधी, विविध विकासकामांचे भूमिपूजन, साखरपुडा, लग्न, सत्यनारायण महापूजा यांचे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रीतसर नियोजन आखून ते वेळ पाळून उपस्थिती दर्शवीत आहेत.तर एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये विविध मेजवानीचे नियोजन आखले जात आहे. त्यामध्ये तरुण कार्यकर्ते वाढदिवस साजरा करून त्यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करून उपस्थिती दर्शवल्याची माहिती देण्यात येत आहे. यामध्ये गल्लीतील कार्यकर्ते थेट महाराष्ट्र विधानभवनाचा आणि आपला फोटो लावतात व जिल्हा परिषद पुण्याचा फोटो वापरला जातो.सध्या मावळ तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. वारेमाप पैसा मिळाल्याने छोटे छोटे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करताना दिसत आहेत.मुहूर्त कमीया वर्षी लग्न समारंभासाठी मुहूर्त कमी असल्याने एकाच दिवशी बहुतेक लोक लग्नाची तारीख धरत आहेत. त्यामुळे त्यांची अजूनच पळापळ होते. तरीदेखील तोंड दाखवून, एक सत्कार घेऊन आशीर्वाद देत असताना दिसत आहेत. मावळ तालुक्यात पंचवीस वर्षे भाजपाची सत्ता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे या तालुक्यात परिवर्तन होणार का, अपक्ष उमेदवार यामध्ये उडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक जण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.विकासकामांचा धडाकातसेच मावळ तालुक्यात सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधीकडून गावोगावी जाऊन विविध विकासकामाचा उद्घाटनाचा धडाका सुरू करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ या मावळच्या तीन ग्रामीण भागात विकासकामाच्या जिल्हा परिषद,मावळ पंचायत समितीच्या व स्थानिक आमदार फंडाच्या माध्यमातून उद्घाटनासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी धडाका लावला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड