कामशेत : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा टायर फुटून ती दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधील एक जण ठार झाला तर चालक जखमी झाला आहे. या अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहिती नुसार, बुधवार दि. २१ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावाच्या हद्दीत पुणेकडून मुंबईकडे जाणारी स्कोडा कार (क्र. एमएच ०६ एझेड ३३४५) ही वेगात जात असताना टायर फुटल्याने ती पुणे लेनवर येऊन टेम्पो (क्र. एम एच १२ बी पी १०९१)ला ठोस मारून कार मार्गाच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील हर्षवर्धन दिलीप पांडव (वय २८, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याचा मृत्यू झाला तर आशिष मानेर मिस्त्री हा जखमी असून त्याच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला धडकून कारचा अपघात, एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:41 IST
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा टायर फुटून ती दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधील एक जण ठार झाला तर चालक जखमी झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला धडकून कारचा अपघात, एक ठार, एक जखमी
ठळक मुद्देअपघातात एक जण ठार झाला तर चालक जखमी, अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसानआशिष मानेर मिस्त्री हा जखमी असून त्याच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु