शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीने वाढले तापमान

By admin | Updated: April 10, 2017 02:34 IST

गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी

रावेत : गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी शहराचे तापमान मार्चअखेरीस ३५ अंशांच्या जवळपास स्थिर असायचे. परंतु वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि आजूबाजूची उपनगरे आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग यांचे २०१२ नंतर मोठा प्रमाणात विस्तारीकरण होत गेले. चाकण, रांजणगाव, शिरूर, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी अशा चारही बाजूंनी उद्योगधंद्यांचे जाळे वाढत गेले. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणसुद्धा वाढत गेले. वाढत्या विकासाबरोबर जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहिली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. मावळ-मुळशी, तसेच पश्चिम घाट परिसरामधील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त हरितपट्टा नामशेष झाला आहे. हरित नियमांचे पालन न केल्यामुळे पुढील काळामध्ये तापमान वाढतच गेल्याची नोंद झाली. सन २०१२ ते २०१७ चा विचार केला असता, मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये तापमानात एक एक अंशांनी वाढतच गेले. ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान आता वाढ होत जाऊन ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे.वाढत्या तापमानामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून, नागरिक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान चिंताजनक असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, रवी भावके, तुकाराम दहे, विजय जगताप, विद्या शिंदे आदींनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)याकरिता काय करणे गरजेचे आहेनगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यांनी एकत्रितपणे संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक. सिमेंटमुळे सर्वांत जास्त कार्बन उत्सर्जन होते. त्याकरिता ‘ग्रीन हाउस’ प्रोजेक्ट हाती घेणे आवश्यक.शहर परिसरात, आरक्षित, मोकळ्या भूखंडांवर, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालय परिसर, उद्योगनगरी परिसर, नदी पात्र परिसर अशा सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यकदेशी झाडे, कमी पाण्यावर जगणारी झाडे (वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, अशोक) या झाडांचे रोपण आवश्यकहरित क्रांती करून हरित पट्ट्यांची निर्मिती करून कार्बन डाय आॅक्साइडवर नियंत्रण ठेवू शकता येईल.सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त वाढवावाहरितपट्टा, जंगल कायदा याचे काटेकोरपणे पालन व्हावे. वृक्षतोड न करता पुनर्रोपण पद्धतीचा वापर वाढवावा.