शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी ताकवणे, मंचरकर, साने, मासुळकर

By admin | Updated: September 15, 2015 04:20 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विशेष समित्यांच्या सभापतींची निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विशेष समित्यांच्या सभापतींची निवड सोमवारी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत करण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या विशेष सभेत विधी समिती सभापतिपदी नंदा ताकवणे, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी गीता मंचरकर, शहर सुधारणा समिती सभापतिपदी स्वाती साने, तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी समीर मासुळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी अभिषेक कृष्णा या नवनियुक्त सर्व समिती सभापतींचे अभिनंदन करण्यात आले. पीठासन अधिकारी अभिषेक कृष्णा, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, राष्ट्रवादी कॉँग्रेसप्रणीत अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी माजी महापौर आर. एस. कुमार, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, नीलेश पांढारकर, गोरक्ष लोखंडे, वसंत लोंढे, सुजित पाटील, जावेद शेख, जितेंद्र ननावरे, अ‍ॅड. नितीन लांडगे, नगरसदस्या भारती फरांदे, नीता पाडाळे, चारुशीला कुटे, वैशाली जवळकर, सुमन नेटके, शैलजा शितोळे, सुभद्रा ठोंबरे, पौर्णिमा सोनवणे, अमिना पानसरे, साधना जाधव, सुजाता पालांडे, आरती चोंधे, संगीता पवार, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, दत्तात्रय फुंदे, नगरसचिव उल्हास जगताप, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)