शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

रिंगरोडबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:56 IST

एक महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करण्यास सर्वपक्षिय समितीच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आहे. लवकरच ही बैठक होणार आहे.

रावेत : एक महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करण्यास सर्वपक्षिय समितीच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आहे. लवकरच ही बैठक होणार आहे.चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पिंपळे गुरव या दाट लोकवस्ती परिसरातून जाणाºया प्रस्तावित रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोडबाधित नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, पोस्ट कार्ड पाठवा, स्मरण पदयात्रा, प्रबोधन अशा विविध मार्गाने नागरिक आंदोलन करत आहेत. भोसरीतील मुख्यमंत्र्यांच्या दौºयातही शिष्टमंडळाची भेट झाली नव्हती.या प्रश्नाबाबत आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली आणि सत्ताधाºयांनी समिती निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वपक्षिय समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होती. त्यांच्याशी रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार होते. परंतु, एक महिना उलटून गेला तरी सर्वपक्षिय समिती मुख्यमंत्र्यांना भेटली नव्हती. त्यामुळे बाधित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या सर्वपक्षिय समितीमध्ये सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे यांचा समावेश आहे. रिंगरोडबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षिय समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात वेळ दिला आहे.रिंगरोडबाबत सर्वपक्षीय समिती मनापासून काम करीत नाही. समितीने मनापासून काम केल्यास यश नक्की मिळेल. त्यासाठी सर्वपक्षीय अवलोकन समितीने वेळेत आणि मनापासून काम करणे गरजेचे आहे. या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांना री-अलायमेन्ट (पर्यायी रस्ता) अहवाल सादर करावा. त्यावर जरूर तोडगा निघेल.- विजय पाटील, समन्वयक, घर बचाव संघर्ष समिती