शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तळवडे गावठाण विकणे आहे

By admin | Updated: October 11, 2016 01:27 IST

महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे

तळवडे : महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे आयटी पार्क, जोतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्तीपर्यंतचा भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग बनवताना पूर्वी असलेल्या वॉर्डची मोठ्या प्रमाणात विभागणी करण्यात आली असल्याने तळवडे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. असंतोष व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात निवडणूक प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करताना तळवडे गावठाण विकणे आहे, चिखलीकरांना प्राधान्य अशा आशयाचा फलक लावला आहे.तळवडे गावठाणचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी तळवडे व रुपीनगर हा ग्रामपंचायत असलेला भाग महापालिकेत समावेश झाल्यानंतर वॉर्ड रचनेत तळवडे व रुपीनगर हा एक नंबरचा वॉर्ड होता. पण, आता प्रभागरचनेत तळवडेचा एक नंबर प्रभागात, तर रुपीनगरचा बारा नंबर प्रभागात समावेश करण्यात आल्यामुळे प्रभाग क्रमांक एकचे विभाजन झाले आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी तळवडे रुपीनगर ग्रामपंचायत होती. त्यानंतर तळवडे गावठाण रुपीनगर, चिखली, त्रिवेणीनगर, मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती असा वॉर्ड होता. त्यानंतर तळवडे गावठाण आणि रुपीनगर असा वॉर्डरचना करण्यात आली. या प्रत्येक वेळेस रचना करताना ग्रामपंचायतीचा भाग अविभाज्य ठेवला गेला. पण, २०१७च्या निवडणुकीसाठी मात्र प्रभागरचना करताना तळवडे ग्रामपंचायत असलेल्या तळवडे आणि रुपीनगर भागाचे शीर आणि धड असे विभाजन केली असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. (वार्ताहर)ग्रामस्थ संतप्त : प्रतिनिधित्व न मिळण्याची भीतीमुळातच तळवडे व रुपीनगर परिसर पहिल्यापासून एकाच प्रभागात अथवा वॉर्डमध्ये असून, रेड झोन आणि त्यानुषंगाने असलेल्या अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, तसेच विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्याही सारख्याच आहेत. महापालिका सभागृहात या समस्यांची जाण असलेला प्रतिनिधी पोटतिडकीनं समस्या मांडू शकतो, म्हणून तळवडे विभागाचा समावेश प्रभाग क्रमांक १२मध्ये असणे सोयीचे ठरेल, पण प्रभागरचना करताना चिखली येथील मतदार संख्येच्या मानाने तळवडेची मतदार संख्या अतिशय तुटपुंजी संख्या ठरेल. अशी प्रभागरचना केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच तळवडे गावातील प्रतिनिधी निवडला जाऊ शकत नसल्याचे उघड झाले असल्यामुळे ग्रमस्थांतर्फे निवडणूक प्रशासनाचा निषेध केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.