शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आधी नेत्यांना शपथ घ्यायला लावा

By admin | Updated: January 29, 2017 04:02 IST

‘‘मावळातील नेते मंडळींत मतभेद व दुफळी होत असल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे. तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार निवडून आणू’’ अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे

कामशेत : ‘‘मावळातील नेते मंडळींत मतभेद व दुफळी होत असल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे. तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार निवडून आणू’’ अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी केली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते व अनेक पदाधिकाऱ्यांमधून आवाज आला, ‘आधी पक्षाच्या नेते मंडळींना शपथ द्यायला लावा, मग आम्ही घेऊ’. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर सुरू होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. तरीही नेते व कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे दर्शन झालेच. कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा प्रथम नेत्यांना पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची शपथ घ्यायला लावा, अशी आग्रही मागणी केली.अजित पवार यांनी भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान म्हणतात, मी फकीर आहे, पण सर्वसामान्य माणूस संसारी आहे. हे त्यांच्या का लक्षात येत नाही? अशी टीका त्यांनी केली.माजी आमदार कृष्णराव भेगडे, राजेंद्र खांदवे, वैशाली नागवडे, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब नेवाळे, संत तुकाराम साखर कारखाना उपाध्यक्ष बापू भेगडे, गणेश खांडगे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, सभापती अतिष परदेशी, सचिन घोटकुले, ललिता कोतूळकर, बाळासाहेब काजळे, अतुल वायकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)